शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

निसर्गाने दिली साथ मात्र वन्यप्राणी करतात घात

By admin | Published: September 22, 2016 12:42 AM

पाणी त्याची बाणी व कसेल त्याची शेती, असे शेती हंगामासाठी प्रामुख्याने बोलल्या जाते.

विहीरगाव ग्रामवासीयांची व्यथा : रानडुकरे व हरिणांचा उपद्रव सुरूबोंडगावदेवी : पाणी त्याची बाणी व कसेल त्याची शेती, असे शेती हंगामासाठी प्रामुख्याने बोलल्या जाते. यावर्षीचा शेती हंगाम प्रारंभीच अत्यंत दगदगीचा व आर्थिक क्लेशदायक ठरणारा गेला. परंतु नंतर आलेल्या दमदार पावसाने हिरवेगार झालेले शेत वन्यप्राण्यांच्या हैदोसाने नष्ट होत आहेत.विहीरगाव, सिलेझरी शेतशिवारात पुरेसा पाण्याच्या अभवानी शेतजमिनी पडीत राहिल्या. ऐन रोवणीच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने रोपांची वाढ खुंटली. गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये दमदार पाऊस बरसल्याने धानाच्या पिकांना जीवदान भेटून नवसंजिवनी मिळाली. शेतशिवार हिरवा शालू पांघरल्यासारखा दिसते. धान रोपांची डोळ्यात भरण्यासारखी वाढ पाहून गावातील बळीराजांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले दिसते. ऐनवेळी निसर्गाने चांगली साथ दिली. परंतु दुसरीकडे जंगलामधील वन्यप्राणी धान पिकांचे घात करीत आहेत, अशी व्यथा विहीरगावच्या शेतकऱ्यांनी मांडली.विहीरगाव (बर्ड्या), सिलेझरी गावातील शेतकऱ्यांच्या बहुतांश जमिनी जंगलव्याप्त परिसराला लागून आहेत. जंगली जनावरांचा गावकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. शेतामध्ये असलेले उभे पीक वन्यप्राणी झुंबडाने येवून संपूर्ण नेस्तनाबूत करतात, अशी विहिरगाववासीय शेतकऱ्यांची ओरड आहे. विशेषत: रानटी डुक्कर, हरिण यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असल्याने धानपिकाची नासाडी होत असल्याचे विहीरगावचे शेतकरी बेनीराम शिवणकर यांनी सांगितले. वन्यप्राण्यांचा नेहमीच धुमाकूळ असल्याने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची युवा प्रगतीशील शेतकरी विश्वनाथ वालदे यांनी आपबीती सांगितली. विहीरगाव व सिलेझरी शेतशिवाराला जंगलव्याप्त परिसर आहे. शेताजवळच्या भागात तलावसुद्धा आहे. वन्यप्राण्यांसाठी आवश्यक असलेली संरक्षित जागा असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांचा वावर असल्याचे विहीरगावचे शेतकरी शालीकराम गायधने, गोपीचंद शिवणकर, डोये, प्रेमलाल शिवणकर यांनी सांगितले.मागील आठवड्यामध्ये निसर्गाने खुल्यामनाने कृपापात्र दाखविल्याने धान पिकाला दिलासा मिळून जीवदान मिळाले आहे. हलक्या प्रतीचे धान निसवत आहे. सध्या धानाचा हंगाम ‘सोने पे सुहाना’ सारखा आहे. परंतु वन्यप्राणी आजघडीला धानपिकाचे घात करीत असल्याचे विहीरगावच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नवेगावबांध वनपरिक्षेत्रात सदर परिसर येत असून वनविभागाने जंगली जनावरांना आळा घालण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)