मूर्तीकार पुन्हा व्यस्त : मंडप उभारणीच्या कामाला सुरूवातगोंदिया : गणेशोत्सवाची सांगता होते न होते तोच गोंदियावासीयांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहे. गोंदिया शहराची शान असलेल्या नवरात्रोत्सवाची तयारी शहरात जोमात सुरू असल्याचे दिसून येते. गणरायाला निरोप देऊन मूर्तीकार आता दुर्गामातेच्या मूर्ती साकारण्यात व्यस्त दिसून येत आहेत. मंडळांकडून मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. येत्या १ तारखेला मातेचे आगमन होणार असल्याने सर्वांनाच दुर्गोत्सवाची प्रतीक्षा लागली आहे.राज्याच्या टोकावर वसलेल्या गोंदिया जिल्ह्यात नवरात्रोत्सव थाटात साजरा केला जातो. त्यातही विशेष म्हणजे गोंदिया शहरात नवरात्रोत्सवाची धूम काही औरच असते. यामुळेच येथील नवरात्रोत्सवाची दूरवर ख्याती आहे. या प्रसिद्धीमुळेच मध्यप्रदेश व छत्तीसगडसह दूरवरून भाविक येथील उत्सवाची भव्यता बघण्यासाठी नवरात्रोत्सवाच्या काळात गोंदियात येतात. त्यामुळेच येथील उत्सवाची भव्यता दरवर्षी वाढतच चालली आहे. हजारोंच्या संख्येत नवरात्रोत्सवाच्या काळात भाविक गोंदियात येत असल्याने या नऊ दिवसांत शहर गजबजलेले असते. शिवाय नऊ दिवस दुर्गामाता विराजमान राहत असल्याने हे दिवस नवचैतन्याने भरलेले असतात. येत्या १ तारखेला घटस्थापना असून मातेचे आगमन होणार असल्याने मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. आपले मंडप वेगळे व आकर्षक बनावे यासाठी मंडप उभारणी जोमात सुरू आहे. त्यातही येथील काही मंडळांच्या उत्सवाची ख्याती असल्याने त्यांचे काम जोमात सुरू आहे. शिवाय मुर्तीकारही घेतलेल्या आॅर्डरच्या मुर्त्या तयार करण्यासाठी आपल्या परिवारासह सध्या व्यस्त दिसून येत आहेत. तर मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीसाठी कामाला लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)कोलकाताचे मूर्तीकार शहरातदुर्गा मातेच्या मुर्ती शहरातील मुर्तीकार बनवित असतात. मात्र गोंदियातील दुर्गाउत्सवाची ख्याती लक्षात घेत कोलकातातील मुर्तीकार शहरात दाखल झाले आहेत. सिव्हील लाईन्सच्या रेल्वे क्वार्टर परिसरातील हे मुर्तीकार आले असून त्यांनी मुर्ती तयार करण्यास सुरूवात केली आहे. या मुर्तीकारांचे गोंदियातील हे दुसरे वर्ष आहे. साहित्यांची दुकाने सज्ज दुर्गामातेच्या श्रृंगारासाठी लागणारे दागिने, शस्त्र व अन्य साहीत्यांची दुकाने सज्ज झाली आहेत. आता काही दिवस मातेच्या आगमनासाठी उरलेले असल्याने व ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी मंडळांकडून आतापासूनच सामानाची खरेदी केली जाते. त्यामुळे दुकानादारांनी दुर्गोत्सवासाठी ेलागणारे साहित्य मागवून ठेवले असून दुकान सज्ज करून ठेवले आहे.
गणेशोत्सवापाठोपाठ गोंदियाकरांना नवरात्रीचे वेध
By admin | Published: September 18, 2016 12:30 AM