शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

‘नवतपा’ जिल्ह्याला तापवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 8:46 PM

उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रवीराज आता चांगलेच तापू लागले असून अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या शनिवारपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे. आताच पारा ४३ अंश सेल्सिअस पार झाला असताना नवतपात तर काय होणार याची कल्पना करूनच घाम फुटत आहे.

ठळक मुद्दे२५ पासून होणार सुरूवात : जिल्ह्याचा पारा ४३ अंश पार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रवीराज आता चांगलेच तापू लागले असून अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या शनिवारपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे. आताच पारा ४३ अंश सेल्सिअस पार झाला असताना नवतपात तर काय होणार याची कल्पना करूनच घाम फुटत आहे.उन्हाळ््याच्या अवघ्या चार महिन्यांतील सर्वाधिक गरमी नऊ दिवसांत पडते असे म्हटले जाते व त्यालाच ‘नवतपा’ म्हणतात. नवतपामध्ये रोहिणी नक्षत्र लागत असून रवीराज आपली आग ओकत असल्याने हे नऊ दिवस चांगलेच तापतात. एक प्रकारे सुर्यदेव पृथ्वीच्या अगदी जवळ आल्याचे वाटू लागते. यंदा येत्या शनिवारपासून (दि.२५) २ जून पर्यंत नवतपा लागत आहे. त्यामुळे २५ तारखेपासूनचे नऊ दिवस कसे असणार याची कल्पना करताच अंगाची आग होत आहे.यंदाचा उन्हाळा अवकाळी पावसाच्या वारंवारच्या हजेरीमुळे कसा तरी निघून गेला. मात्र मे काही सुचू देत नसल्याच अनूभव या २० दिवसांत आला व उन्हाळयाचे चटके चाखायला मिळत आहे. उन्हाच्या तिव्रतेमुळे पारा ४३.५ अंश सेल्सिअस पार करीत आहे. उन्हाची ही सरशी बघता घरातून बाहेर निघणे कठिण झाले आहे. उन्ह वाढतच चालल्याने गरम हवेच्या लाटा वाहत असून अंगाची लाही-लाही होत आहे. परिणामी दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. उन्हामुळे नागरिक घराबाहेर निघणे टाळत असून सायंकाळी कामे आटोपत असल्याचे दिसत आहे.उन्हाच्या दाहकतेमुळे सायंकाळीही गरम लाटा लागत आहे. यातून उकाडा किती याचा अनूभव येत आहे. अशात नवतपा आणखी किती भाजणार आहे याची धसकी सर्वांनी घेतली आहे. नवतपाचे हे दिवस एकदाचे निघून जावे याचीच सर्व वाट बघत आहेत.एसी व कूलर झाले फेलउन्हाळ््यापासून मुक्ती मिळावी यासाठी एसी व कूलरचा सहारा घेतला जात आहे. मात्र उष्णता एवढी आहे की त्यापुढे एसी व कूलरसुद्धा फेल ठरत आहे. उष्ण हवेच्या लाटांमुळे एसी व कूलरची हवा उष्ण होत आहे. मात्र काही केल्या गरमीपासून मुक्तता मिळणे कठिण झाले आहे. तर घरांवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांतूनही अंगाला भाजून टाकणार एवढे गरम पाणी येत आहे. त्यामुळे दिवसभराच्या उष्णता व घाम यामुळे चिपचिप झालेल्या अंगाला धुवून काढण्यासाठी सायंकाळची आंघोळही कठिण झाली आहे.

टॅग्स :Temperatureतापमान