बिरसी-फाटा : जिल्ह्याला प्रफुल्ल पटेलांसारखे खंबीर नेतृत्व मिळाले असून, कोरोना संक्रमणाच्या काळात जे कार्य त्यांनी केले ते इतर कुणीही करू शकत नाही. जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रमुखांना सूचना करीत पक्ष संघटन मजबुतीने कार्य करण्यासोबतच प्रत्येक बूथ पातळीवर कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूक महत्त्वाची असून, राष्ट्रवादी काँग्रेस हा जनसामान्यांचा पक्ष, अशी ओळख कार्यकर्त्यांनी निर्माण करावी. आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही, हे जनतेला पटवून द्यावे, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
तिरोडा तालुक्यातील ग्राम अर्जुनी येथे श्यामसुंदर बावनकर यांच्या निवासस्थानी आयोजित जिल्हा परिषद क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला योगेंद्र भगत, राजलक्ष्मी तुरकर, प्रेमकुमार रहांगडाले, कैलाश पटले, मनोज डोंगरे, रविकांत बोपचे, राजू ठाकरे, नत्थू अंबुले, ओमेश अंबुले, समीकुमार बन्सोड, राजू चव्हाण, चंद्रकुमार भगत, अल्केश मिश्रा, अंगलाल लिल्हारे, बालू चौडलवार, ब्रिजलाल परिहार, नीलकंठ परिहार, अनिल भगत, पुष्पा बोपचे, प्रिया बावनकर, शारदा पटले, बालू बावनथडे, उमन बनकर, इंदू चौधरी, फंदूलाल पटले, भाऊलाल पटले, रमेश भोयर, वासू वैद्य, बबन कुभडे, ताराचंद नखाते, भरत बावनकर, बेनिराम बारेवार, किरण बन्सोड, वातू बावनथडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत परिसरातील समस्यांवर चर्चा करण्यात आली.
------------------------
जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेकांचा प्रवेश
बैठकीत राहुल वहिले, अक्षय भगत, निरंजन कडव, टेकलाल साकुरे, किशोर पटले, भुमेश्वर परिहार, जगदीश परिहार, संजय बोपचे, उमेश कोटांगले, यशवंत कडव, योगेश्वर अंबुले, राजेश बावनकर, सुषमा बावनकर, ढेकल पटले, सखाराम पटले, सामजी कामळे, भरत बावनकर, तरुण कनोजे, काशीनाथ येसणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.