लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने मुंबई येथे बेकायदेशीररीत्या अटक केली. मलिक यांनी भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराने आरोप केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. केंद्र सरकार सूडबुद्धीचे राजकारण करीत असून, याचा गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी रस्त्यावर उतरत याचा निषेध नोंदविला. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांच्या भष्ट्राचाराविरोधात आवाज बुलंद केला होता. यामुळे सूडबुद्धीतून केंद्र सरकारने बेकायदेशीर ईडीची कारवाई करीत मलिक यांना अटक केल्याचा आरोप केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी निदर्शने करीत राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदार सचिन गोसावी यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात माजी खा. डाॅ. खुशालचंद्र बोपचे, तालुका अध्यक्ष केवल बघेले, शहर अध्यक्ष कुष्णकुमार बिसेन, ऋषीपाल टेंभरे, सोमेश रहांगडाले, भूपेश गौतम, प्रतीक पारधी, कमलेश बारेवार, बाबा बहेकार, उषा रामटेके, सुषमा अगडे, अर्चना चौधरी, अनिता तुरकर, सुरेंद्र रहांगडाले, आनंद बडोले, चौकलाल येडे, शंकर बिसेन, भास्कर काठेवार, भूपेंद्र बघेले, शिवकुमार रंहागडाले, रवींद्र कटरे यांचा समावेश होता.