तिरोडा : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महिला संदर्भात चुकीचे शब्द वापरले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी केली. याचे राज्यभरात पडसाद उमटले असून जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसने यांचा निषेध नोंदवित दरेकर यांच्या विरोधात तिरोडा पोलीस स्टेशन येथे बुधवारी (दि. २२) तक्रार दाखल केली.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर यांच्या नेतृत्वात प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन ठाणेदार योगेश पारधी यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर ह्यांच्या सूचनेनुसार गोंदिया जिल्हा महिला राष्ट्रवादी काॅंग्रेस तर्फे दरेकर यांचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच बदनामी केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात राजलक्ष्मी तुरकर, तालुका अध्यक्ष जया धावडे, शहर अध्यक्ष ममता बैस, माजी सभापती पं.स. नीता रहांगडाले, सरपंच सविता पटले यांचा समावेश होता.