लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅससह विद्युत कनेक्शन, रासायनिक खताच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, सोने तारण, कर्जमाफी, रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात आलेल्या वनविभागाच्या कामातील गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, एससी, एसटी,ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्वरित द्या, आदी मागण्यांना घेवून तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.या वेळी विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले. येथील विंधेश्वरी राईस मिल येथून माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, रमेश ताराम यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य व शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. या वेळी मोर्चेकºयांनी सरकारच्या जनहित विरोधी धोरणाविरुध्द जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अच्छे दिनचे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल करणाºया सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले.पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरसह जीवनावश्यक वस्तुच्या वाढत्या किंमतीमुळे सर्व सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात आणण्याची मागणी या वेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बबलू दोनोडे, युवा तालुकाध्यक्ष योगेश देशमुख,आसाराम पालीवाल, सत्यवान देशमुख, फगनू कल्लो, अमरदास नोबोईर, रवि बडवाईक, धर्मा मानकर, मनोहर राऊत, श्रावण बिंझलेकर, हेमराज कोसरकर, राजाराम सलामे, सर्वानंद कवास, संजय कुंभरे, राजेश बिंझलेकर, बबलू भाटीया, मनिष मोटघरे, मंजुषा वासनिक, तालुका महासचिव बंटी भाटीया, तालुका युवा सचिव नितेश वालोदे, बांधकाम सभापती नेमीचंद आंबीलकर, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, तालुका महिलाध्यक्ष पारबता चांदेवार, पंचायत समिती सदस्य अर्चना ताराम, तालुका कोषाध्यक्ष गोपाल तिवारी, नगरसेविका माया निर्वाण, छोटेलाल बिसेन, केशवराव भूते, संजय दरवडे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार आणि पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 10:13 PM
केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅससह विद्युत कनेक्शन, रासायनिक खताच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, सोने तारण, कर्जमाफी, रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात आलेल्या वनविभागाच्या कामातील गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, एससी, एसटी,ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्वरित द्या, ....
ठळक मुद्देमहागाईवर नियंत्रण लावा : तहसीलदारांना दिले निवेदन