लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शेकडो बोअरवेल नादुरूस्त असून त्यांच्या दुरूस्तीसाठी दोन हजार पाईची गरज होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ नऊशे पाईप खरेदी केले. परिणामी अनेक गावांमधील बोअरवेल बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची पाळी आली आहे. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात प्रशासन पूर्णपणे फेल झाले आहे.जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी जलाशयांमध्ये केवळ १५ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भूजल पातळीत सुध्दा दोन ते तीन मीटरने घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्याची खालावलेली भूजल पातळी पाहता यंदा उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाला दिलेल्या अहवालातून वर्तविली होती. या अहवालानंतर जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखड्यात दर्शविलेल्या ४०० वर गावांमध्ये पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करणे अपेक्षीत होते. मात्र प्रशासनाने मार्च महिन्याच्या अखेरीस पाणी टंचाई निवारणाच्या कामाला सुरूवात केली. ग्रामीण भागात सार्वजनिक विहिरी, बोअरवेल, पाणी पुरवठा योजना हेच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत. मात्र जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यात नादुरस्त असलेल्या बोअरवेलची कामे उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी सुरूवात केली नाही. परिणामी गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली. जिल्ह्यातील नादुरुस्त बोअरवेलच्या दुरुस्तीसाठी सुटे साहित्य व २ हजार पाईपची मागणी जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांनी जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे नोंदविली होती. मात्र जिल्हा परिषदेने आपली हुशारी दाखवित केवळ ९०० पाईप मागविले.त्यामुळे अर्ध्या गावांमधील बोअरवेल दुरूस्तीची कामे होऊ शकली नाही. गावातील बोअरवेल बंद असल्याने महिलांना पहाटेपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.टंचाईग्रस्त गावांची संख्या दाखविली कमीजिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावे वगळता सर्वच तालुक्यात पाणी टंचाईची समस्या आहे. महसूल विभागाने जाहीर केलेल्या पैसेवारीच्या अहवालावरुन सुध्दा जिल्ह्यातील ४०० वर गावांमध्ये पाणीे टंचाईची समस्या आहे. मात्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केवळ ३३४ गावांमध्ये पाणी टंचाई असल्याचे दाखवित पाणी टंचाईची समस्या सौम्य असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकारजिल्ह्यातील बंद असलेल्या बोअरवेलची दुरूस्ती व विद्युत देयकाअभावी बंद असलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती. मात्र यापैकी कुठलेही काम किंवा उपाय योेजना जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केल्या नाही. परिणामी गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना सुरू करण्याची गरज होती. मात्र प्रशासनाने जेव्हा समस्या गंभीर होईल, तेव्हा कामाला लागू अशी भूमिका घेतली आहे. तहान लागल्यावर पाणी खोदण्याचा प्रकार जिल्हा प्रशासनाबाबत दिसून येत आहे.जिल्हाधिकारी साहेब कुठे?जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर असून ग्रामीण भागातील नागरिकांची ओरड वाढत आहे. पालकमंत्री सुध्दा आढावा बैठकीत पाणी टंचाईवर उपाय योजना करण्याचे निर्देश देतात. मात्र प्रत्यक्षात उपाय योजना केवळ कागदावरच सुरू आहे. ही सर्व परिस्थिती जिल्हाधिकाºयांना माहिती असून सुध्दा त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या मुद्दावर जिल्हाधिकारी साहेब कुठे असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.
गरज २००० पाईपची मागविले फक्त ९००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:30 AM
जिल्ह्यातील शेकडो बोअरवेल नादुरूस्त असून त्यांच्या दुरूस्तीसाठी दोन हजार पाईची गरज होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ नऊशे पाईप खरेदी केले.
ठळक मुद्देपाणी टंचाई उपाययोजनेत प्रशासन फेल : गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती