लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नळ आल्यानंतर घरातील संपूर्ण पाणी भरुन झाल्यानंतर अनेकजण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही चारचाकी वाहन व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून धूत असतात. पाणी भरुन झाल्यानंतर नळाचे पाणी बंद करणे गरजेचे असताना नळ सुरु आहे म्हणून अनावश्यक पाण्याची नासाडी केली जाते.एकीकडे माठभर पाण्यासाठी पायपीट सुरु असते. तर बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अपव्यय सुरु असतो. यावर पाबंद घालणे गरजेचे आहे. अन्यथा आपणाला भविष्यात पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.नदीतून पाणी आणताना यंत्रणा पाणी शुद्ध करते. यासाठी पाणी आणणे ते फिल्टर हाऊसमध्ये नेणे, तेथे शुद्धीकरण करणे, मग ते पाणी टाकीत साठवून दररोज वार्डानुसार सोडणे, याकरिता पाण्यासाठी काही खर्च आलेला असतो. पण याचा विचार न करता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एका व्यक्तीला ८ ते ८० लीटर पाणी लागते. अशा तºहेने पाण्याचा वपार केला तर पाणी पुरणार कसे.नळाला पाणी जाईपर्यंत अनेकजण नको तितके पाणी वापरतात. घरातील कामे झाली की पाईप जोडतात, मग ते अंगणात व झाडांना पाणी टाकत असतात. सर्वाधिक पाणी वाहन आणि जनावरे धुण्यासाठी वापरले जाते.अनेकजण आठवड्यातून दोन ते तीन वेळा कार व अन्य वाहन तसेच जनावरे धुतात. त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असते.पाणी बचतीसाठी जनजागृती गरजेचीशहरी तसेच बहुतेक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. मात्र बहुतेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय केला जातो. असाच पाण्याचा अपव्यय होत राहिल्यास भविष्यात पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा समाना करावा लागणार आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.
पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 8:40 PM
नळ आल्यानंतर घरातील संपूर्ण पाणी भरुन झाल्यानंतर अनेकजण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही चारचाकी वाहन व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून धूत असतात. पाणी भरुन झाल्यानंतर नळाचे पाणी बंद करणे गरजेचे असताना नळ सुरु आहे म्हणून अनावश्यक पाण्याची नासाडी केली जाते.
ठळक मुद्देजनजागृती आवश्यक : वाहन व जनावर धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर