मोहाडी-चोपा येथे कार्यक्रम: नाबार्ड योजनेचा केला प्रचार लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी-चोपा : नाबार्ड योजना प्रचार व प्रसाराकरीता आर्थिक साक्षरता अभियानाचे आयोजन जिल्हा बँकाकडून करण्यात येत आहे. ग्राम पंचायत सभागृह मोहाडी येथे गोंदिया जिल्हा डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह बँक शाखा चोपा अंतर्गत कॅशलेस व्यवहार अधिक सुलभ होण्याकरीता बँक व्यवस्थापक राजू कटरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खातेदार, ग्राहक, शेतकरी सभासदांना कॅशलेस व्यवहाराची माहिती, सर्व खातेधारकांनी रुपे डेबिट कार्डचा वापर करणे, खातेदारास आरटीजीएस/एनईएफटी सुविधेची माहिती देणे, जास्तीत जास्त खातेदारांना चेकद्वारे व्यवहार करण्यास प्रवृत्त करणे, डेबीट कार्ड द्वारे स्वाईप करून खरेदी व्यवहार करणे, बँकामधील सूचना फलकाचे महत्व समजून घेणे, डिजीटल सेवाचा वापर करा, मोबाईल क्रमांक आपल्या खात्याशी जोडा, एटीएम मशीनचा वापर करा, अशा प्रकारे भविष्यात बँकाना कमी रक्कम मिळणार आहे. म्हणून कॅशलेस व्यवहार ही काळाची गरज आहे असे कटरे यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी उपसरपंच श्रीराम पारधी, प्रमुख अतिथी मुख्यालय अधिकारी व्ही.एन.कन्नमवार, सरपंच ध्रुवराज पटले, नरेंद्र चौरागडे, अध्यक्ष से.सह.संस्था भाऊलाल चव्हाण, सुनिल कोरे, बंडूबिसेन, एस.के.रंगारी, उरकुडा कोल्हे, धनराज जयतवार, नोजलाल बिसेन, खेमराज लांजेवार, भयंकर बिसेन, मार्कंडराव ब्राम्हणकर, मनोज वालदे, लोकराम बोपचे, बबलू भेंडारकर, कुसराम, एफ.आर.देशमुख, गोवर्धन पटले उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
कॅशलेस व्यवहार काळाची गरज
By admin | Published: June 10, 2017 2:07 AM