लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या देशात कष्टकºयाला कमी पगार आणि बिनकष्टकºयाला अधिक पगार दिला जातो. जो शेतकरी वर्षभर आपल्या रक्ताचे पाणी करुन एका दाण्याचे हजार दाणे करतो, तो आज उपेक्षेचे जीणे जगत आहे. हे फार बिकट चित्र आहे. अद्यापही शेतकºयांचा गांभीर्याने विचार केला जात नाही. मात्र आता त्यांचा गाभीर्याने विचार न केल्यास एक दिवस त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल, असे मत सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.शहरातील विविध सामाजिक संस्थांतर्फे रविवारी रेलटोली येथील भवभूती रंगमंदिरात आयोजित ‘माझी हक्काची भाऊबीज’ या कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला नगराध्यक्ष अशोक इंगळे, आमदार परिणय फुके, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, माजी कुुलगुरू शरद निंबाळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, राजेश चतूर उपस्थित होते.पुढे बोलताना अनासपूरे म्हणाले, जोपर्यंत शेतकºयांच्या शेतमालाला योग्य दर मिळणार नाही, तोपर्यंत शेतकरी दिवाळी साजरी करु शकणार नाही. सरकारची चुकीची धोरणे आणि धारणाच शेतकºयांच्या सद्यस्थितीला कारणीभूत आहेत. दिवसेंदिवस शेतकºयांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होत आहे. आपल्या पाठीशी कुणीही नाही, या धारणेतून हताश होवून ते आत्महत्या करित असल्याचे चित्र आहे.मात्र शासन आणि प्रशासनाला अद्यापही शेतकºयांची प्रश्न समजून ती सोडविता आली नाही. शेतकºयांचे पोट दोन वेळी जर समाधानाने भरत असते तर त्यांनी आत्महत्या केली असती का? असा सवालही अनासपूरे यांनी केला.देशात ५५ टक्के शेतकरी आहेत. मात्र हा कापूस उत्पादक, तो धान उत्पादक अशी त्यांची विभागणी करुन त्यांना एकत्र येऊ दिले जात नाही. जोपर्यंत ही सर्व विभागणी बाजुला सारुन शेतकरी एकत्र येणार नाहीत. तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुध्दा मार्गी लागणार नाहीत. शेतकºयांनी पांरपारिक शेतपिकांसह आता त्याला पूरक धंद्याची जोड देण्याचे आवाहन अनासपुरे यांनी केले.निंबाळकर यांनी, सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकºयांच्या कुटुंबियांवर हे संकट ओढवले आहे. हे संकट ओढवू नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. भुजबळ पाटील आणि ठाकरे यांनी प्रशासनातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.आमदार फुके यांनी, सरकार शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच दोन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची सर्व जबाबदारी घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.यावेळी शेतकºयांच्या विधवांनी उपस्थित मान्यवरांची भाऊबीज निमित्त ओवाळणी केली. संचालन सविता बेदरकर आणि दुुलीचंद बुध्दे यांनी केले.५५ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना मदतविविध सामाजिक संस्थातर्फे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील एकूण ५५ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आलीे. तसेच त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले.आयुष्यभर बांधव होण्याची भूमिका पार पाडा‘माझी हक्काची भाऊबीज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी विधवांना आम्ही तुमचे भाऊ तुमच्या सर्व संकटात सक्षमपणे उभे राहु असे वचन दिले. मात्र या वचनाचे पालन करुन आयुष्यभर बांधव होण्याची भूमिका पार पाडावी, असे आवाहन अनासपूरे यांनी केले.
शेतकºयांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:50 PM
आपल्या देशात कष्टकºयाला कमी पगार आणि बिनकष्टकºयाला अधिक पगार दिला जातो.
ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : माझी हक्काची भाऊबीज कार्यक्रम