शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
4
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
5
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
6
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
8
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
9
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
10
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
12
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
13
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
14
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
15
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
16
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
17
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
18
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
19
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
20
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात

समाजाच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज!

By admin | Published: February 08, 2017 1:06 AM

समाजाच्या सर्व क्षेत्रातील विकासात्मक प्रगतीसाठी सर्व तेली समाज बांधवांनी एकत्र येऊन विचारमंथन करुन

गडगेकर महाराजांचे प्रतिपादन : तालुकास्तरीय तेली समाज मेळावा देवरी : समाजाच्या सर्व क्षेत्रातील विकासात्मक प्रगतीसाठी सर्व तेली समाज बांधवांनी एकत्र येऊन विचारमंथन करुन समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करावा असे प्रतिपादन शिवाचार्य महास्वामी गडगेकर महाराज यांनी केले. विदर्भ तेली समाज महासंघाच्यावतीने आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव व तालुकास्तरीय तेली समाज मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र तेली महासभा पूर्व विदर्भ अध्यक्ष सुभाष घाटे, स्वागताध्यक्ष म्हणून जिला अध्यक्ष आनंद कृपाण, झामसिंग येरणे तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुमन बिसेन, तेली समाज तालुकाध्यक्ष भास्कर धरमशहारे, नगरसेवक नेमीचंद आंबीलकर, माया निर्वाण, कांता भेलावे, खरेदी-विक्री संघाच्या सभापती पारबता चांदेवार, पं.स.सदस्य गणेश सोनबोईर, देवरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी भैय्यालाल चांदेवार, उपाध्यक्ष प्रभाकर निर्वाण, युवा कार्यकारिणी अध्यक्ष अ‍ॅड. पुष्पकुमार गंगभोईर, श्रीहरी चांदेवार, हंसराज चंदनमालागार आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष अतिथी घाटे यांनी, समाजाची दशा आणि दिशा यावर प्रकाश टाकत समाजासाठी थोडा तरी वेळ प्रत्येकाने दयावा असे मत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतीक स्पर्धांमधील विजेत्यांना व शालांत व माध्यमिक परीक्षेत प्राविण्यासह गुणांकन प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर समाजातीलच चांदेवार कुटुंबातील मुलीचा विवाहसोहळा समाजाच्यावतीने पार पडला. संचालन इंजि. घनश्याम निखाडे व प्रा.सुषमा चांदेवार यांनी केले. प्रास्ताविक सचिव राजेश चांदेवार यांनी मांडले. आभार कुलदीप लांजेवार यांनी मानले.