लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या अनेक वाटा फुटतात. परंतु नेमका कोणता मार्ग निवडावा याबाबत विद्यार्थ्यानच्या मनात गोंधळ निर्माण होतो. याकरीता विद्यार्थ्याना मार्गदर्शन म्हणून तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज आॅफ पॉलीटेक्नीक, आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ नागपूर विभागाचे उपसचिव डॉ.एस.जे.पाटील व सहाय्यक सचिव ए.जे.फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली फिरता तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यामध्ये १५०० ते २००० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.मेळाव्याचा उद्घाटन दिनांक़ २७ डिसेंबर २०१७ ला सकाळी ११ वाजता आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथे करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार केशवराव मानकर यांच्या हस्ते सहायक सचिव ए.जे.फुलझेले म.रा.त.शि.मं. विभागीय कार्यालय नागपूर, अध्यक्ष भवभूती शिक्षण संस्था आमगाव सुरेशबाबू असाटी व प्राचार्य डी.एम.राऊत व यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.तीन दिवसीय मेळाव्याचे आयोजन श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टीट्टयुट आॅफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. डी.के.संघी, पॉलीटेक्नीक कॉलेजचे प्राचार्य संदीप हनुवते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.तीन दिवसीय फिरता तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्यात विद्यार्थ्याना तंत्रशिक्षणाचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बारावीनंतर कोणत्या क्षेत्राची निवड करायची यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ज्या विषयात रुची आहे त्या क्षेत्राची निवड केल्यास ध्येय गाठणे शक्य होत असल्याचे सांगितले.स्थानिक आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव, विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालय आमगाव, विद्यानिकेतन हायस्कूल आमगाव, गवराबाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झालीया, सालेकसा हायस्कूल सालेकसा, स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोनपुरी, मिलींद विद्यालय गोरठा, संत जयरामदास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ठाणा, मनिभाई ईश्वरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय सोनी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डी.एम.राऊत, प्राचार्य अजय पालीवाल, प्राचार्य कमलबापू बहेकार, प्राचार्य डी.एम.टेंभरे, प्राचार्य पी.के.गाळे, प्राचार्य यु.टी.मस्करे, प्राचार्य एस.एन.गोलीवार, प्राचार्य सी.जी.पाऊलझगडे व प्राचार्य व्ही.टी.पटले यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मार्गदर्शक यांनी तंत्रशिक्षणाची गरज व विद्यार्थ्याना तंत्रज्ञान काय हे माहीत करुन दिले. या मार्गदर्शन मेळाव्याच्या माध्यमाने विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणाची आवड निर्माण होऊन राष्ट्रविकासास चालना मिळेल. मेळाव्या अंतर्गत विद्यार्थ्याना प्रवेश प्रक्रियेबाबद माहिती, शालांत अभ्यासक्रमानंतर तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत विविध अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्याना व पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली.सदर आयोजित फिरते तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे प्रास्ताविक सादर करताना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सहाय्यक सचिव (ता.) ए.जे.फुलझेले यांनी तंत्रशिक्षणामध्ये कौशल विकासाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन व आभार प्रा.एन.जे.कथलेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.पंकज कटरे, प्रा.महेंद्र तिवारी, भरत नागपुरे, मनिष मेश्राम यांनी सहकार्य केले.
देशाच्या प्रगतीसाठी तंत्रशिक्षणाची नितांत गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:16 AM
दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या अनेक वाटा फुटतात. परंतु नेमका कोणता मार्ग निवडावा याबाबत विद्यार्थ्यानच्या मनात गोंधळ निर्माण होतो. याकरीता विद्यार्थ्याना मार्गदर्शन म्हणून तंत्रशिक्षण संचालनालय, .....
ठळक मुद्दे ए.जे.फुलबांधे : तीन दिवसीय फिरते तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा