लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संपूर्ण भारतात कलार समााजचे विशाल अस्तित्व आहे. परंतु विभिन्न उपजातीमध्ये विखुरलेल्या समाजाचे राजकीय अस्तित्व फार कमी आहे. म्हणून समाजाच्या प्रगतीसाठी व राजकीय अस्तित्व प्राप्त करण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे असे उद्गार मध्य प्रदेशचे खनिज मंत्री प्रदीप (गुड्डा) जायस्वाल यांनी केले.गोंदिया येथील जैन कलार समाजाच्या सभागृहाचे भूमिपूजन व स्नेह संमेलन कार्यक्रम गुरूवारी पार पडला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक कलार समाजाचे राष्ट्रीय नेते मोहनसिंग आहुलवालीया यांच्या करण्यात आले. तर पाच लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आ.गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सभापती शैलजा सोनवाने, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, अ.भा.कलार समाजाचे अध्यक्ष मुकेश शिवहरे, राष्ट्रीय कलचुरी महासंघाचे अध्यक्ष दीपक जायस्वाल, बिरसी विमानतळाचे संचालक सचिन खंगार, माजी सभापती प्रकाश रहमतकर, मनोहरभाई पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद हरडे, समाजाचे अध्यक्ष तेजराम मोरघडे, सचिव एल.यू.खोब्रागडे, माजी अध्यक्ष काशीनाथ सोनवाने, अशोक लिचडे उपस्थित होते. सर्वप्रथम माता जैनादेवी व भगवान सहस्त्रबाहू यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन विधीवत पूजन करण्यात आले. सचिव खोब्रागडे यांनी समाजाच्या वाटचालीबद्दल सविस्तर माहिती दिली. आ.अग्रवाल म्हणाले जैन कलार समाजातर्फे वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे समाजात एकोप्याचे वातावरण राहते. समाजाच्या विधायक कार्याला आपण सदैव सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेतील श्रृती सोनवाने,ज्योती सोनवाने, श्रावणी मोरघडे, मेहंदी स्पर्धेतील जिज्ञासा मोरघडे, सलोनी तिडके, ज्योती सोनवाने, प्रिती भांडारकर, एकल नृत्यात अवनी चिर्वतकर, आचल हजारे,जयेश मुरकुटे, समूह नृत्यांत वैदही भांडारकर व खुशी हलमारे, प्रिया खंगार, रंजू हजारे, सुप्रिया मोरघडे यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. महिला समितीद्वारा आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात शिला ईटानकर, यशोधरा सोनवाने, प्राजक्ता रणदिवे, विणा सोनवाने, हर्षा आष्टीकर, वत्सला पालांदूरकर, ज्योती किरणापुरे, रेखा कावळे, चेतना रामटेककर, सीमा ईटानकर, वर्षा तिडके व संगीता पालांदूरकर यांनी मार्गदर्शन केले.या वेळी स्व. परसराम मोरघडे यांच्या स्मृतित भैयालाल मोरघडे यांनी एक लाख रुपयाचा धनादेश, स्व.उदाराम खोब्रागडे यांच्या स्मृतित सुखराम खोब्रागडे यांनी २५ हजाराचा धनादेश तर स्व. चैतराम मुरकुटे यांच्या स्मृतित हेमंत मुरकुटे यांनी ११ हजाराचा धनादेश समाजाला दिला. कार्यक्रमाचे संचालन यशोधरा सोनवाने व उमेश भांडारकर यांनी तर आभार सचिव वरुण खंगार यांनी मानले. कार्यक्रमासाठी तेजराम मोरघडे, शालीकराम लिचडे, सुखराम हरडे, लालचंद भांडारकर, अशोक ईटानकर, मनोज भांडारकर, चंद्रशेखर लिचडे, संजय मुरकुटे, मनोज किरणापुरे, सचिन पालांदूरकर, अतुल खोब्रागडे, राजकुमार पेशने, विशिष्ट खोब्रागडे, मुकेश हलमारे, विजय ठवरे, मनिष ठवरे, देवानंद भांडारकर, शिवाजी सोनवाने, श्याम लिचडे, दीपक रामटेककर, उल्हास सोनवाने, राजेश तिडके, शालीनी हरडे, उषा मोरघडे, संगिता चिर्वतकर, अनिता मुरकुटे, रोशन दहिकर, सचिन भांडारकर, लोकेश ईटानकर, नामदेव सोनवाने यांनी सहकार्य केले.मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कारकार्यक्रमात सामान्य ज्ञान परीक्षेतील अ गटात श्रृती सोनवाने,आर्या तिडके, केशव सोनवाने तर ब गटात किर्तीक भांडारकर, ईशिका मुरकुटे, केशव लिचडे व गुणवंत विद्यार्थी, पियूश ईटानकर, यशस्वी चिर्वतकर, टिंकल कावळे, प्रचिती आष्टीकर, नितीश ईटानकर, जिज्ञासा मोरघडे यांचा सत्कार करण्यात आला.
समाजाच्या प्रगतीसाठी संघटित होणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:23 AM
संपूर्ण भारतात कलार समााजचे विशाल अस्तित्व आहे. परंतु विभिन्न उपजातीमध्ये विखुरलेल्या समाजाचे राजकीय अस्तित्व फार कमी आहे. म्हणून समाजाच्या प्रगतीसाठी व राजकीय अस्तित्व प्राप्त करण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे असे उद्गार मध्य प्रदेशचे खनिज मंत्री प्रदीप (गुड्डा) जायस्वाल यांनी केले.
ठळक मुद्देप्रदीप जायस्वाल : जैन कलार समाजाचा स्रेहसंमेलन कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार