परसवाडा : देशात महिलांवर होणारे अन्याय अजूनही थांबलेले नाही. तेव्हा महिलांना आपला आत्मसन्मान टिकवून ठेवण्यासाठी व आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी महिला सक्षमीकरण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा व विधी सल्लागार ॲड. माधुरी रहांगडाले यांनी केले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित ज्येष्ठ महिलांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. उद्घाटन रजनी कुंभरे व दीपप्रज्वलन सरपंच तुमेश्वरी बघेले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राणी बालकोठे, मेघा बिसेन, प्रतिमा पटले, झुनेश्वरी वासनिक, राणी सोनवणे, स्वाती चौधरी, गायत्री चौधरी, रागिनी पटले, वनिता सेलोकर, प्रतिमा जैमतवार उपस्थित होते. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले, सरस्वती माता, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, संत तुकडोजी महाराजांच्या छायाचित्राला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ महिला व सामाजिक कार्यकर्त्या चारुशिला वैद्य, शकुंतला चौधरी, प्रभा घरजारे, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, शशीकला मेश्राम, रजनी काटकर, दुर्गा भगत, देवलन बोपचे, शोभा बिसेन, यमु नंदेश्वर, चंद्रकला कटरे, कल्पना रिनाईत, वनमाला डाहाके, गौरी जोशी, सुमती पांडे, पुष्पा भांडारकर व इतर महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बौद्धिक खेळ, वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा तसेच मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. संचालन मेघा बिसेन यांनी केले. आभार जानकी पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठी मीनाक्षी ठाकरे, सुजाता बिसेन, जयश्री बिसेन, सुमन बिसेन यांनी सहकार्य केले.