शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

तिरोडा परिसरात रात्रीकालीन देहव्यवसाय

By admin | Published: June 15, 2015 12:46 AM

तिरोडा परिसरातील काही गावांचा परिसर देहव्यापारासाठी कुप्रसिद्ध होत आहे. अदानी पॉवर प्रोजेक्टलगतच्या...

बाहेरगावातून येतात तरुणी : नेण्याची व सोडण्याची स्वतंत्र व्यवस्थाकाचेवानी : तिरोडा परिसरातील काही गावांचा परिसर देहव्यापारासाठी कुप्रसिद्ध होत आहे. अदानी पॉवर प्रोजेक्टलगतच्या परिसरातील ७ ते १० कि.मी. जंगल परिसरासोबतच काही निवडक ठिकाणी देहव्यवसाय चालत असल्याच्या चर्चेला ऊत येत आहे. एवढेच नाही तर बाहेरगावाहून मुलींना बोलावून सकाळ होण्यापूर्वी परत पाठविल्या जात आहे. हा प्रकार परिसरातील नागरिकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे.काचेवानी रेल्वे स्टेशन परिसर, अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकरिता तयार करण्यात आलेल्या वसाहतीच्या मार्गावर रात्रीला बाहेरुन येणारे युवक युवतींना घेऊन चाळे करीत असल्याचे परिसरातील अनेकांनी प्रत्यक्ष पाहीले आहे. देहव्यवसाय करणाऱ्या तरुणी रेल्वे किंवा रस्ता मार्गाने तिरोडा, काचेवानी, गंगाझरी आणि सर्वाधिक गोंदिया स्थानकात उतरतात. संपर्कात असणारे तरुण गाड्या घेवून जातात आणि त्यांना हवे तिथे किंवा सुरक्षित ठिकाणी नेतात आणि सकाळ होण्यापूर्वी त्यांना रेल्वे स्थानकावर सोडतात. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.काही स्थानिक बांधकाम ठेकेदार अधिकाऱ्यांना खुश करण्याकरिता तरुणी पुरविण्याच्या कामात सहभागी असल्याचा चर्चा परिसरात आहेत. काही तरुणी व महिला नागपूर आणि रायपूरच्या दिशेने येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्या खूप दूर अंतरावरून येत नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. प्रवास करताना त्या तरुणी स्कार्फने चेहरा बांधतात आणि गाडीत बसल्यानंतर काचेतून ओळख करता येत नाही. याचाच फायदा घेत हा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू आहे. देह व्यवसायात संलग्न असणाऱ्या आणि आॅर्डरवर येणाऱ्या तरुणी व महिलांना सुरक्षित स्थळी आणल्या जाते आणि सुरक्षितपणे सोडल्या जाते. स्वत:चा परिवार असल्याचे समजून कोणी संशयाने त्यांच्याकडे पाहण्याचे टाळतात. यापूर्वी तिरोडा जंगल परिसरात ‘लैला-मजनूंच्या जोड्या वावरताना अनेक नागरिकांनी पाहिल्या. काही लोकांनी त्यांना पकडून त्यांच्याकडून पैसे उकळून तर काहींनी त्यांची अब्रू लुटल्याच्या घटना घडल्या. आजही जंगल परिसरात हे प्रकार सुरू असले तरी याचे प्रमाण कमी झाले आहे. काचेवानी रेल्वे परिसर ते स्थानकाच्या बाहेरील भागाकडे काही ठिकाणी देहव्यवसायाशी संबंधित महिला बाहेर गावावरून येणाऱ्या तरुणीला सुरक्षित ठेवतात आणि दिवस निघण्यापूर्वी रवाना करतात. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणी रात्री ९ किंवा ११ च्या गाडीने येतात आणि पहाटेच्या टाटानगर-इतवारी गाडीने नागपूरच्या दिशेने परत जातात. याची माहिती परिसरातील नागरिकांना आहे, परंतु नागरिक काहीही करण्यास असमर्थ आहेत. (वार्ताहर)गावखेड्यातील नागरिक हतबलअदानी पॉवर स्टेशनच्या ेपरिसरातील काही गावखेड्यात या देहव्यापाराच्या चर्चा अनेक नागरिकांना माहित आहे. याचा वाईट परिणाम पुढील पिढीवर तर होणार नाही, अशा चिंतेत सुज्ञ नागरिक आहेत. अनेकदा हा प्रकार काही लोक उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतरही काही करण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन, तसेच पोलीस खात्याच्या गुप्तचर विभागाने सतर्क राहावे, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.स्थानकावर तपासणीची व्यवस्था हवीदेह व्यवसायाशी संलग्न असणाऱ्या तरुणी आणि महिला सायंकाळी हजर होवून पहाटे किंवा सकाळी अदृश्य होतात. रायपूर-नागपूर, छत्तीसगड एक्सप्रेस, इतवारी दुर्ग मेमू, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, अहमदाबाद-हावडा, इतवारी-डोंगरगड, इतवारी-टाटानगर यासह अन्य गाड्यांतून तसेच रस्ता मार्गाने येणाऱ्या तरुणींना गाडीतून नेण्याची व्यवस्था केली जाते. रात्रीला आपला शौक पूर्ण करुन त्यांना पुन्हा स्टेशनवर सोडले जाते. याची माहिती पोलिसांना आहे. पण ते दुर्लक्ष करतात. वास्तविक सायंकाळी ६ वाजेनंतर सर्व तरुणी किंवा संशयास्पद महिलेचे ओळखपत्र तपासण्याची सक्ती करणे तसेच पारिवारिक पुरावे तपासण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. याकडे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन प्रकाराला आळा घालण्यासाठी रेल्वे स्थानकावर तपासणीची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे.