लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी/ शेंडा (कोयलारी) : बिबट्याने सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात धुमाकूळ घातल्याने नागरिक दहशतीत आहेत. शेळ्या व कोंबड्यांची शिकार करणाºया बिबट्याची परिसरातील गावांमध्ये दहशत पसरली आहे. जवळच्या निमगाव येथे गेल्या आठवडाभरापासून बिबट्याने धूमाकूळ घातल्याने गावकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. शेजारच्या जंगल परिसरातून रात्रीच्यावेळी गावात बिबट्या येतो व कोंबड्यांना आपले भक्ष्य बनवितो. बुधवारच्या (दि.१६) रात्री बिबट्याने पहिले गोठ्यात बांधलेल्या एका बकरीला जागीच ठार केले तर एका बकरीला गंभीर जखमी केले. एक कोंबड्याला भक्ष्य बनवून गावातून पळाला या प्रकाराने गावातील नागरिक दहशतीखाली आहेत.निमगावामध्ये गेल्या एका आठवड्यापासून बिबट्याने धूमाकूळ घातला. गावामध्ये बिबट येत असल्याची माहिती, गावकºयांनी संबंधित वनविभागाला दिली. बिबट्याला गावातून हाकलून लावण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाºयांनी गावात रात्रीची गस्त घालणे सुरू केली. बिबट्याने गावात येताच सर्वप्रथम कोंबड्यावर ताव मारण्याचा पराक्रम केला. वाघाचा गावात ये-जा असली तरी काही त्रास जाणवला नसला तरी मात्र गावकºयांमध्ये भिती निर्माण झाली आहे. गाव दहशतीखाली वावरताना दिसत आहे. बुधवारच्या रात्री ११.४५ वाजता बिबट्या गावात आला. गावाच्या मधोमध असलेल्या रामदास रघू मेश्राम यांच्या घरी गोठ्यात बांधलेली बकरीची शिकार केली. महागू गेडाम यांच्या घरच्या बकºयाला जखमी केले. बळीराम कोल्हे यांच्या छपरीमध्ये झाकून ठेवलेला कोंबडा जागीच मारुन सोबत घेवून पळ काढला. गावामध्ये वनविभागाच्या कर्मचाºयांची गस्त असल्याचे गावकºयांनी सांगितले. ५ हजार रुपये किंमतीच्या बकरीच्या नडीचा घोट घेवून बिबट वाघाला रक्ताची चाट लागल्याने गावकºयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागानी गावात येणाºया बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकºयांकडून होत आहे. शेंडा (कोयलारी) येथील देवचंद नुळशीराम पाटील (६०) यांची गोठ्यात बांधलेली गाभन शेळी रात्री १ वाजताच्या सुमारास बिबट्याने फस्त केली.१७ च्या पहाटे शेळीचा शोध घेण्यासासाठी निघालेल्या इसमाना ती जंगलातील रस्स्त्यावर मृतावस्थेत दिसली.याची माहिती वन विभाागाचे क्षेत्र सहाय्यक मोहतुरे यांना देण्यात आली.शेळी मालकाने काल सायंकाळी शेळ्या चारुन आपल्या व त्यांना गोठ्यात बांधून ठेवले होते. रात्री १ वाजताच्या सुमारास शेळ्या ओरडण्याचा आवाज ऐकताच घरची मंडळी जागे होवून गोठ्यात जाऊन बघितले असता एक गाभण शेळी गायब झाली होती.मोहल्यातील जवळपासचे दोन चार लोक शेळीचा शोध घेण्यासाठी जंगलाच्या दिशेने गेले मात्र अंधारामुळे त्यांना शेळी दिसली नाही. परत आज पहाटे शेळीचा शोध घेण्यासाठी निघाले असता ती जंगलातील कालव्याच्या रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आली.
निमगाव व शेंडा/कोयलारीत बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 1:09 AM
बिबट्याने सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात धुमाकूळ घातल्याने नागरिक दहशतीत आहेत. शेळ्या व कोंबड्यांची शिकार करणाºया बिबट्याची परिसरातील गावांमध्ये दहशत पसरली आहे.
ठळक मुद्देशेळी, कोंबड्याची शिकार : वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा