शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जिल्ह्यात नऊ टक्के रोवण्या-आवत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:03 AM

वरूणराजाच्या अवकृपेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ््यात दीड महिना लोटून गेल्यानंतरही पावसाचे समाधानकारक आगमन न झाल्यामुळे जिल्ह्यातील फक्त नऊ टक्के आवत्या व रोवणे झाले आहेत. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या व्हायला पाहिजे होत्या.

ठळक मुद्देजिल्ह्यात दुष्काळी स्थिती : आतापर्यंत ८० टक्के रोवण्या अपेक्षित

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वरूणराजाच्या अवकृपेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ््यात दीड महिना लोटून गेल्यानंतरही पावसाचे समाधानकारक आगमन न झाल्यामुळे जिल्ह्यातील फक्त नऊ टक्के आवत्या व रोवणे झाले आहेत. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या व्हायला पाहिजे होत्या. परंतु बळीराजावर आता निसर्गही कोपल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती दिसून येत आहे.गोंदिया जिल्ह्यात खरीप पिकासाठी दोन लाख पाच हजार ८६९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी भात पिकासाठी एक लाख ९६ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी सहा हजार ५९१.४० हेक्टर क्षेत्रात आवत्या पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली. तर १७ हजार ६३४.४० हेक्टर जमिनीत धानाची नर्सरी लावण्यात आली. यापैकी १० हजार ४१७.९७ हेक्टर रोवणीचे काम झाले आहे. संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती पाहता आवत्या व रोवणी पकडल्यास फक्त नऊ टक्के काम झाले आहे. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या आटोपायला पाहिजे होत्या. परंतु तसे काही झाले नाही.९ जुलै पासून पावसाने सतत दडी मारल्यामुळे शेतात टाकण्यात आलेले पºहे कोमेजले आहेत. येत्या पाच-सहा दिवसांत पाऊस न आल्यास परिस्थिती गंभीर होणार आहे. यासाठी इतर उपाय योजना करणे गरजेचे आहे. दरवर्षीच्या तुलनेत २४ जुलै पर्यंत सरासरी ५६७.१२ मिमी पाऊस पडणे अपेक्षीत होते. परंतु आतापर्यंत फक्त २५४.६९ मिमी म्हणजेच ४५ टक्के पाऊस पडल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे स्पष्ट चिन्ह आहेत. शासनाने गोंदिया जिल्हा शंभरटक्के दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. मात्र शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटजिल्ह्यात उशीरा पाऊस पडला आणि पहिल्या पावसानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात लावलेले पºहे करपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात १३ हजार ८२५ क्विंटल कमी कालावधीचे भात बियाणे कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे आले होते. त्यापैकी नऊ हजार ८०० क्विंटल बियाणे आजही कृषी केंद्र चालकांकडे आहेत. ते बियाणे परत कंपन्यांना पाठवू नये. कारण गोंदिया जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता असल्याचे स्वत: कृषी विभागाने मान्य केले आहे. त्यासाठी कृषी विभागाने जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांना पत्र पाठविले आहे.जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव पारितजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यात शंभरटक्के दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा एकमुखी ठराव बुधवारी (दि.२४) घेण्यात आला. तो ठराव शासनाला पाठविण्यात आला आहे.८०४६ मेट्रिक टन युरिया उपलब्धयंदा पाऊसच न झाल्यामुळे जिल्ह्यात आठ हजार ४६.८६ मेट्रिक टन युरिया जिल्ह्यात उपलब्ध आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना यावेळी कमी पडणारा युरिया यावर्षी कुणी मागतच नाही. पावसाने दडी मारून शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

टॅग्स :agricultureशेती