शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी धावले निसर्ग मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 9:09 PM

वाढत्यामुळे तापमानाचा फटका मानवासह पशु पक्ष्यांना सुद्धा बसत आहे. जंगलातील पानवठे कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. मात्र यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे१६ कृत्रिम पाणवठ्यांची सफाई : जंगल परिसरात ६३३ वन्य प्राण्यांची नोंद

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : वाढत्यामुळे तापमानाचा फटका मानवासह पशु पक्ष्यांना सुद्धा बसत आहे. जंगलातील पानवठे कोरडे पडल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. मात्र यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तळपत्या उन्हान्यात वन्यप्राण्यांची तृष्णातृप्ती करण्यासाठी गोरेगाव येथील निसर्ग मंडळाचे सदस्य वन विभागाच्या मदतीला धावून आले. त्यांनी गोरेगाव तालुक्यातील जंगलातील पानवठ्यांमध्ये पाणी भरुन वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थाबंविण्यासाठी पुढाकार घेतला.तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे.उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात स्थलातंरण होत असते. दरवर्षी बौद्ध पोर्णिमेच्या रात्री पशुगणना होते. ही गणना केवळ जंगल भागातील असते. मागील वर्षी जंगल भागात ६३३ वन्यप्राणी आढळले होते. त्यात दोन बिबट, ११२ चितळ, ८ सांबर, ३३ निलगाय, १४१ रान डुक्कर, ८ अस्वल, ४ भेकर, ३६ मोर, ५ ससे, ३ लांडगे, ३ रानमांजर, २८० माकड अशा एकूण ६३३ वन्यप्राण्यांचा समावेश होता. प्राणी गणनेत उपलब्ध झालेल्या प्राण्यांच्या संख्येनुसार वनविभागाने उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जंगलात कृत्रिम १६ पानवठे तयार केले आहेत. मात्र हे पानवठे सध्यास्थितीत कोरडे पडले होते.त्यामुळे वन विभागाच्या मदतीने निसर्गमित्र मंडळाच्या सदस्यांनी या पानवठ्यांमध्ये टँकरव्दारे पाणी भरुन वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करुन दिले. तालुक्यातील बोळुंदा, पिंडकेपार, तेढा, गराडा, मुरदोली, सोंदलागोंदी, आसलपाणी, मलपुरी, बागळबंद, पठानटोला, निंबा या गावाच्या जवळपास तर कुठे लागूनच जंगल व्याप्त परिसर आहे. या भागात वन्य प्राण्यांसाठी १६ कृत्रिम पानवठे तयार केले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातही वन्य प्राण्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. या पाणवंठ्यांची वनविभागाकडून दररोज पाहणी केली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी एस.एम. जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली.जंगलातील पाणवठ्यांचा शोधवन्यप्राण्यासह स्वत:ची तहान भागविण्यासाठी होत असलेली धडपड व त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या वाढत्या घटना आणि वन्यप्राण्याच्या शिकारीच्या घटनांना पूर्णपणे पायबंद लागवा यासाठी निसर्ग मंडळाच्या सदस्यांनी वनविभागाच्या मदतीने पुढाकार घेतला आहे. जंगलातील पाणवठे शोधून व त्या पाणवठ्याची साफसफाई करुन त्यात पाणी भरले.यांनी घेतला पुढाकारजंगलातील पानवठे स्वच्छ करुन त्यात वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी जाधव यांनी निसर्ग मंडळाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, उपाध्यक्ष गुड्डू कटरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन, सहसचिव दिलीप येळे, कोषाध्यक्ष अंकीत रहांगडाले, सदस्य मोरेश्वर रहांगडाले, दिलीप चव्हाण, योगेश रहांगडाले यांनी सहकार्य केले.गावाच्या बाहेर असलेल्या विहिरीत दोन बांबू उभे करुन ठेवल्यास माकडांना पाणी पिण्याची अडचण होणार नाही. बांबुच्या सहाय्याने माकड विहिरीत उतरुन पाणी पिऊ शकतात. त्यामुळे निसर्ग मंडळाच्या टिमने या सामाजिक उपक्रमाला हातभार लावण्याची गरज आहे.-एस.एम.जाधव वनपरिक्षेत्राधिकारी वनविभाग, गोरेगाव

टॅग्स :water shortageपाणीटंचाईforestजंगल