लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरा दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यातील एटीएमध्ये कॅशचा ठणठणाट निर्माण झाला होता. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच दमछाक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा तीच समस्या निर्माण झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील एटीएम केंद्राबाहेर पुन्हा नो कॅशचे फलक झळकले आहेत. परिणामी ग्राहकांच्या डोकेदुखीत वाढ झाल्याचे चित्र आहे.बँकाना रिर्झव्ह बँकेकडून होणार पतपुरवठा कमी झाला. तसेच दोन हजार, शंभर आणि दोनशे रुपयांचा तुटवडा निर्माण झाल्याने एटीएममध्ये कॅश टाकण्याची समस्या निर्माण झाली असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते. सर्वच एटीएममध्ये एकाचवेळी ठणठणाट निर्माण झाल्याने ग्राहकांची ओरड वाढली होती. त्यानंतर काही बँकानी एटीएममध्ये कॅश उपलब्ध करुन दिली. मात्र मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील एटीएममध्ये कॅशची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच अडचण होत असून दैनदिन गरजा भागविण्यासाठी पैसे असूनही उधार उसनवारी करावी लागत आहे. तर खिशात एटीएम कार्ड असताना सुध्दा आता बाहेरगावी जाणाºया दहावेळा विचार करावा लागत आहे. शहरातील एटीएम केंद्राची समस्या तर फारच गंभीर आहे.येथे राष्टÑीयकृत व जिल्हा बँकांचे ५० वर एटीएम आहेत. मात्र यापैकी केवळ दोन तीन एटीएममध्ये कॅश उपलब्ध असून तिथे सुध्दा केवळ त्याच बँकेचे एटीएम कार्ड स्विकारले जात आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी अडचण होत आहे.ज्या एटीएममध्ये थोडीफार कॅश उपलब्ध आहे त्या केंद्राबाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.ऐन लग्नसराईच्या काळात समस्याशहरासह ग्रामीण भागात सुध्दा सध्या लग्नसराईची धूम आहे. अलीकडे सर्वच जण जवळ पैसे न ठेवता बँकेमध्ये ठेवतात. एटीएम कार्डमुळे केव्हाही पैसे काढता येत असल्याने ते बिनधास्त असतात. मात्र ऐन लग्नसराईच्या कालावधीत एटीएममध्ये कॅशचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांना अडचण जात आहे.कॅशलेस व्यवहारासाठी टंचाईमागील महिनाभरापासून एटीएम केंद्रामध्ये कॅशचा वांरवार तुटवडा निर्माण होत आहे. हा तुटवडा केवळ ग्राहकांना कॅशलेस व्यवहाराची सवय लागावी यासाठीच कॅशचा तुटवडा निर्माण केला जात असल्याची माहिती आहे. एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांने सुध्दा याला दुजोरा दिला.
एटीएमबाहेर पुन्हा नो कॅशचे फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 9:57 PM
मागील पंधरा दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यातील एटीएमध्ये कॅशचा ठणठणाट निर्माण झाला होता. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच दमछाक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा तीच समस्या निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देग्राहकांची भटकंती : बँका म्हणतात कॅशचा तुटवडा नाही