शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पाच महिन्यांपासून ई-निविदाच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2017 12:14 AM

उन्हाळा आला की प्रशासनाला पाणीटंचाइचे डोहाळे लागतात एरव्ही मात्र आश्वासनांची खैरात होत असते.

पाणी पुरवठा विभागाचा प्रताप : नळयोजनांना मंजुरी; मात्र लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : उन्हाळा आला की प्रशासनाला पाणीटंचाइचे डोहाळे लागतात एरव्ही मात्र आश्वासनांची खैरात होत असते. पाणीटंचाईसारख्या गंभीर मुद्यावर शासन व प्रशासन गंभीर नाही. उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईचे नियोजन करण्यात येऊन जिल्ह्यात कित्येक नळ योजना मंजूर झाल्या मात्र त्यांची साधी ई-निविदा प्रक्रियाही पूर्ण होऊ शकली नाही. गोंदिया जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या या गचाळ कारभाराबद्दल जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी खंत व्यक्त केली. केंद्रातील तत्कालीन मनमोहनसिंग सरकारचे कार्यकाळात भारत निर्मल कार्यक्रम व राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असे, केंद्रातील सत्तारुढ शासनाने या योजना बंद केल्या. २ वर्षापर्यंत पाणी पुरवठा योजनेचे स्पष्ट धोरणच नव्हते, गतवर्षी राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरु केला. त्याची अमंलबजावणी जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत सुरु केली. डव्वा जि.प. क्षेत्रातील डव्वा, खजरी, डोंगरगाव, कोहळीटोला व वडेगाव येथे अभियंत्याकडून पाण्याचे स्त्रोत तपासून प्रस्ताव सादर केले. एकाही योजनेला मंजूरी मिळाली नाही. मंत्रालय स्तरावर या योजनांचे सादरीकरण करुन २८ फेब्रुवारी रोजी मंजूरी मिळवून घेतली. यासोबतच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने डव्वा (९६.४८), खजरी (५५.५२), कोहळीटोला/आदर्श (५२.६२), डोंगरगाव/खजरी (५३.९८), वडेगाव (५७.५७), दहेगाव (६३.९२), सतोना (७७.१८), पिंडकेपार (६३.०८), कोडेलोहारा (७३.४५), गुमाधावडा (७१.५०), कनेरी/राम (४५.६१), पूरगाव (७१.२९), भर्रेगाव (५८.४२), निंबा (६०.६१), लोहारा (६९.४०), डब्बेटोला (५४.७७), रापेवाडा (५७.७०), नवरगाव (५९.९७), सहेसपूर (६५.५२), दवडीपार (४८.३५), लोधीटोला (८२.२९), शहारवानी (७८.९०), घाटबोरी/तेली (५२.६१), गिरोला (४४.२७), सावली (४३.२६) व खैरलांजी (५८.०६) लाख रुपयांच्या योजनांंना फेब्रुवारी ते मे या कालावधीत राज्य शासनाकडून मंजूरी मिळाली. या नळ योजनांचे ई-निविदांसाठी अनेक प्रयत्न केले मात्र अद्यापही ई-निविदा प्रक्रिया पूर्णत्वास येऊ शकली नाही. पाणी पुरवठा विभागाच्या या कासवगतीमुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतत आहे. एकंदरीत शासन व प्रशासनाचेच हे अपयश असल्याची खंत परशुरामकर यांनी व्यक्त केली.