कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील बेवारस कुत्र्यांचे निर्र्बीजीकरण व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषद काढत असलेल्या निविदांत कुणालाच ‘इंटरेस्ट’ नसल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, नगर परिषदेला वारंवार निविदा काढूनही एकही निविदा येत नाही. परिणामी निविदा काढण्याचे कार्य नगर परिषदेकडून केले जात आहे. यामुळे मात्र शहर डुकर मुक्त कधी होणार असा सवाल उभा होत आहे.शहरातील बेवारस कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बेवारस कुत्र्यांनी शहरात कित्येकांना चावा घेतल्याचे प्रकारही घडत आहेत. कुत्र्यांना मारता येणार नसल्याने किमान त्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी नगर परिषदेने विशेष सभेत ठराव घेतला व निविदा काढली. शिवाय शहरातील डुकरांची वाढती समस्या लक्षात घेत नगर परिषदेने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठीही विशेस सभेत ठराव घेतला. घेतलेल्या ठरावानंतर नगर परिषदेने बेवारस कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी तसेच डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी निविदा काढली.आश्चर्याची बाब अशी की, नगर परिषद काढत असलेल्या या निविदांत कुणाकडूनही निविदा टाकली जात नाही. परिणामी नगर परिषदेला वारंवार निविदा काढावी लागत आहे. मात्र आतापर्यंत त्याचे काहीच फलीत मिळाले नाही. यामुळे नगर परिषदेला कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी आतापर्यंत तीन वेळा निविदा काढली आहे. तर डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी दोन वेळा निविदा काढण्यात आली आहे. परंतु, सध्या तरी त्यात काहीच हाती लागलेले नाही. यावरून, बेवारस कुत्रे व डुकरांच्या निविदांना घेऊन कुणीच इच्छूक नसल्याचे दिसत आहे.मोकाट जनावरांसाठीही दोनदा निविदाशहरातील मोकाट जनावर (गायी) रस्त्यावर उभे राहत असल्याने वाहतुकीला अडचण होते. यावर नगर परिषदेने मध्यंतरी मोकाट जनावरांना पकडण्याची मोहिम हाती घेतली होती. मात्र गोपाल चांगलेच चिडले होते व नगर परिषदेत चांगलाच धिंगाणा घातला होता. त्यानंतर हा प्रयोग फिस्टकला होता. मात्र नगर परिषदेने मोकाट जनावरांना पकडण्यासाठी पुन्हा निविदा काढली आहे. नगर परिषदेने फेबु्रवारी महिन्यात निविदा काढली असता त्यात कुणीही हात घातला नाही. त्यामुळे आता पुन्हा निविदा काढण्यात आल्याची माहिती आहे.डुकरांची दोन तर कुत्र्यांची तीनदा निविदानगर परिषदेने बेवारस कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी ७ एप्रिल त्यानंतर २१ एप्रिल व २९ जून रोजी म्हणजेच तीन वेळा निविदा काढली आहे. तर डुकरांना घेऊन मे महिन्यात व आता २९ जून रोजी म्हणजेच दोन वेळा निविदा काढली आहे. मात्र कुणीही यात निविदा टाकत नसल्याने निविदा काढण्याचे काम स्वच्छता विभागाकडून केले जात आहे.
कुत्रे व डुकरांच्या निविदेत ‘नो इंटरेस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:05 PM
शहरातील बेवारस कुत्र्यांचे निर्र्बीजीकरण व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषद काढत असलेल्या निविदांत कुणालाच ‘इंटरेस्ट’ नसल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, नगर परिषदेला वारंवार निविदा काढूनही एकही निविदा येत नाही.
ठळक मुद्देनगर परिषद काढते वारंवार निविदा : कुत्र्यांचे निर्बीजीकरण व डुकरांचा बंदोबस्त वांद्यात