लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील रोजंदारी काम करणाºया मजुरांची मजुरी गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेली नाही. परिणामी त्या मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशात जबाबदार अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मजुरी काढून देण्याची मागणी मजूर करीत आहेत.नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कक्ष क्रमांक १२४ भाग-१ मध्ये रायमोनिया व महाडोर निर्मूलनाकरिता १११ मजुरांना रोजगार देण्यात आला होता. मात्र त्यांची मजूरी सहा महिन्यापासून मिळाली नाही. त्यात घाटेझरी ३६, कोसमतोंडी ३५ तर धानोरीचे २९ मजूर कामावर होते. धानोली, कोसमतोंडी व घाटेझरी या गावात आदिवासी बहूल जनता रोजगाराच्या शोधात असतात. सुजलाम-सुफलाम शेती नसल्यामुळे गोरगरीब लोकांना रोजगाराची नितांत गरज आहे. घाटेझरी हे गाव येथून २८ किमी. असून तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे.फायर लाईन व रस्त्याच्या बाजूने गवत कटाईच्या कामावर १० ते १५ दिवस मजूर कामावर होते. त्याचीही मजुरी यांना मिळाली नाही. नागझिरा येथील पाच कमरे परिसरात घाटेझरी येथील ६० मजुरांनी तरोटा उपसण्याचे काम केले. त्या गरीब महिला मजुरांचे पैसे न मिळाल्याने वन्यजीव विभागाप्रती कोसमतोंडी परिसरातील नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. गोरगरीब मजुरांचे पैसे लवकर देण्याची मागणी होत आहे. तरी वरिष्ठ जबाबदार अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.शासनाकडून निधी न आल्याने मजुरांचे पैसे देण्यास विलंब लागला आहे. येत्या दोन-चार दिवसांत त्या मजुरांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जाईल.सचिन शिंदे,वनपरिक्षेत्र अधिकारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभाग साकोली
सहा महिन्यांपासून मजुरीविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 9:18 PM
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील रोजंदारी काम करणाºया मजुरांची मजुरी गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेली नाही. परिणामी त्या मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशात जबाबदार अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मजुरी काढून देण्याची मागणी मजूर करीत आहेत.
ठळक मुद्देनवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प : मजुरांवर उपासमारीची पाळी, अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा