गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. पहिली लाट गेली व दुसऱ्या लाटेचे रौद्र रूप जिल्हावासीयांनी पाहिले. शेकडो लोकांचा यात बळी गेला. शाळा बंदच होत्या व आता वर्ग ८ ते १२ वीपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आली. यासाठी शाळेत जाण्यापूर्वी शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक होते.
यात, वर्ग ८ ते १२ वी पर्यंतच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण होणे अपेक्षित होते. परंतु जिल्ह्यातील १० टक्के शिक्षकांचे लसीकरण अजूनही झालेले नाही. लसीकरण न करताच हे १० टक्के शिक्षक शाळेत पोहोचले आहेत. जिल्ह्यातील १८५३ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. तर २०६ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेच नाही अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
...........................
२०५९
पहिला डोस झालेले शिक्षक- १८५३
दुसरा डोस झालेले शिक्षक- ७१२
पहिल्या दिवशी टेस्टींग करून शाळेत आलेले शिक्षक- ५०
ना टेस्टींग ना लसीकरण-१५६
...................
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा एक साथ नमस्ते
तालुका------ विद्यार्थ्यांची उपस्थिती
गोंदिया- ९८५
तिरोडा-१३४७
गोरेगाव-१७०५
अर्जुनी-मोरगाव- २९७०
सडक-अर्जुनी-३२४
आमगाव-११५७
देवरी-८३६
सालेकसा-१२९
......................
पहिल्या दिवशी १५३ शाळा उघडल्या
यंदा ८ वी ते १२ वीच्या शाळा-महाविद्यालयांची घंटा वाजली आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील १५३ शाळा सुरू करण्यात आल्या. त्यात गोंदिया तालुक्यातील २१, तिरोडा २७, गोरेगाव २५, अर्जुनी-मोरगाव २४, सडक-अर्जुनी १२, आमगाव २०, देवरी १९ व सालेकसा तालुक्यातील ५ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
....................................
एक दिवसात चाचणी करायची कशी
१) शाळा सुरू झाल्यामुळे लसीकरण झाले नाही म्हणून कोविड चाचणी करण्यासाठी मी गेलो होतो. परंतु गर्दी असल्याने परत आलो. उद्या चाचणी करणार आहे.
- एक शिक्षक
२) ताप नाही, सर्दी नाही, खोकला नाही. कोरोनाचा गावात एकही रूग्ण नाही. तरी चाचणी केल्याशिवाय शाळेत जाऊ नका असे ठरल्याने मी चाचणी केल्यावरच शाळेत जाणार आहे. कोविड चाचणी करायला आज जात आहे.
- एक शिक्षक
...........
शंभर टक्के शिक्षकांना लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. ज्यांनी एकही डोस घेतला नाही त्यांनी पहिला डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला त्यांनी दुसरा डोस घेऊन लसीकरण करून घ्यावे.
- प्रदीप समरीत, उपशिक्षणाधिकारी जि. प. गोंदिया.