शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

By admin | Published: March 02, 2017 12:10 AM

नगरपंचायतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर सामावून घेण्याच्या अनुषंगाने नगरपंचायतीच्या सभेचा ठराव घेऊन

अर्जुनी-मोरगाव : नगरपंचायतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर सामावून घेण्याच्या अनुषंगाने नगरपंचायतीच्या सभेचा ठराव घेऊन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी बुधवार दि.१ पासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. यासाठी नगरपंचायतीचा ढिसाळपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. नवनिर्मित नगर परिषदा व नगरपंचायतींमध्ये ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचे समावेश करण्याबाबतचे धोरण शासनाच्या नगरविकास विभागाने निश्चित केले आहे. यासाठी १९ जानेवारी रोजी एक परिपत्रक काढण्यात आले. यात नगरपंचायतींच्या शासन मंजूर आकृतीबंधातील पदावर भुतपूर्व ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याची कार्यपध्दती अनुसरण्यात आली. त्यानुसार कार्यरत कर्मचाऱ्यांचे समावेशनासाठी नगरपंचायतीचा ठराव घेणे आवश्यक आहे. शासनाचा हा आदेश निघून एक महिन्याचा कालावधी लोटला मात्र स्थानिक नगर पंचायत पदाधिकाऱ्यांनी अद्याप ठराव घेतलेला नाही. ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाल्यानंतर पात्र भूतपूर्व कर्मचारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधीकरणातील अतिरीक्त कर्मचारी यांच्या नेमणूका करून नगरपंचायतीचा कारभार चालविण्याचे धोरण आहे. आवश्यकता असल्यास नवीन पदभरती करण्याचे परिपत्रकातीलन नमूद आहे. मात्र स्थानिक नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे हा प्रश्न अंधातरी आहे. इतर तालुक्याच्या नगरपंचायतींनी ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केल्याचे ऐकीवात आहे. नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी खा. नाना पटोले यांच्या जनता दरबारात ही समस्या त्यांचे समोर मांडली. त्यांनी नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे यांना तातडीने ठराव घेऊन समस्या दूर करण्यास सांगितले. मात्र वृत्त लिहेस्तोवर स्थानिक नगरपंचायतीने ठराव घेतला नसल्याने हे काम बंद आंदोलन सुरूच आहे. या प्रकारामुळे नगर पंचायत प्रशासनातर्फे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच करवसुली, स्वच्छता, दिवाबत्ती सुविधा दाखले हे प्रश्न ऐरणीवर आहेत. (तालुका प्रतिनिधी)