दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : .देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली. पण एका आठ वर्षाच्या चिमुकलीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आधार घ्यावा लागतो. कशासाठी? कचरा वेचून पोट भरण्यासाठी!एकीकडे देशाच्या स्वातंत्र्यांचा जल्लोष सुरु होता. शाळकरी चिमुकले कागदी राष्ट्रध्वज हातात घेऊन देशाभिमान दर्शवित होती. तर दुसरीकडे जल्लोष, राष्ट्रध्वज बघत-बघत ती कचऱ्यात पोटाची भूक शोधत होती. पोटाची खळगी भरण्यासाठी कचºयात स्वातंत्र्य शोधणाºया त्या बाल मजुराची व्यथा मन सुन्न करणारी तेवढीच क्लेशदायक आहे.एकीकडे स्वातंत्र्यांचा जल्लोष तर दुसरीकडे त्याचदिवशी रक्षाबंधनाचा सन सकाळी आठची वेळ, आठ वर्षाची चिमुकली हातात पांढऱ्या रंगाची चुंगडी घेऊन कचऱ्यातून स्वत:चे आयुष्य वेचत होती. गोरेगावच्या मुख्य रस्त्याच्या पलीकडे कऱ्यातून पोटाचा प्रश्न सोडविण्याऱ्या चिमुकलीकडे स्थानिक दानविराचे लक्ष गेले असेल नसेल पण जे काही भिषण चित्र नजरेआड झाले. ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य कुणाला मिळाले? यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील त्या चिमुकलीला कुठे राहतेस, काय करतेस, तुझा फोटो घेतो. असे लोकप्रतिनिधीनीने म्हटल्यावर तिचे स्मित हास्य कॅमेरात कैद झाले आणि एक भिषण सत्य पुढे आले.कसले स्वातंत्र्य कसले सन, कचºयाच्या मिळकतीतूनच पोट भरावे हे तिचे खरे स्वातंत्र्य आणि पोट भरल्यावर मिळणारा आनंद म्हणजे खरा सन. त्या चिमुकलीचा हा कल्पनाविलास जगण्यातले खरे संदर्भ सांगणारे असले तरी हे वेदनादायी आयुष्य स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही कुणी उपभोेगत असेल तर या देशातील लोकशाहीला हे झापड मारण्यासारखे आहे.देशात समाजात दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर आहे.अशिक्षीतपणा हेच दारिद्र्याचे मुळ कारण आहे. असे असले तरी, शासन दरबारी असलेल्या विविध योजना या चिमुकल्यापर्यंत का पोहचत नाही हा खरा प्रश्न आहे.शाळाबाह्य मुले शैक्षणिक प्रवाहात आली पाहिजे. मात्र कागदावर शाळाबाह्य मुले शुन्य दाखविणाऱ्या शिक्षण विभागाला असे कचरा वेचणारे चिमुकले दिसत नाही याचे अश्चर्य व्यक्त होणे स्वाभाविकच आहे. त्या आठ वर्षाच्या मुलीला कचरा वेचून पोटाची खळगी भरण्याची वेळ यावी, ही घटना मन सुन्न करणारी आहे.ज्या वयात आशावाद उराशी बाळगून मनसोक्त खेळण्याची, शाळेत जाण्याची वेळ असताना त्या चिमुकलीला पोटाचा प्रश्न सतावत असेल तर यापेक्षा मोठे दुदैव काय असेल. देशात-जिल्ह्यात असे कचरा वेचून स्वत:चा उदरनिर्वाह करणारे बरेच असतील आणि आहेत. पण ऐन स्वातंत्र्याच्या व रक्षाबंधनाच्या दिवशीच एखादी चिमुकली स्वातंत्र्यदिनात सामील न होता चक्क सकाळी-सकाळी कचरा वेचतांना दिसत असेल तर तिला खरेच स्वातंत्र्य मिळाले काय याविषयी चिंतन व्हायलाच पाहिजे.
स्वातंत्र्याचा जल्लोष नव्हे... पोटाची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:08 AM
देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली. पण एका आठ वर्षाच्या चिमुकलीला पोटाची खळगी भरण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आधार घ्यावा लागतो. कशासाठी? कचरा वेचून पोट भरण्यासाठी!एकीकडे देशाच्या स्वातंत्र्यांचा जल्लोष सुरु होता.
ठळक मुद्देसंडे अँकर । स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधणाच्या दिवशीच चिमुकलीची पायपीट