शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

आरोग्य कर्मचाऱ्यांअभावी अनेक गावे ‘नॉट रिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 8:59 PM

जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २२ उपकेंद्र आहेत. प्रत्येक उपकेंद्रात शासनाकडून २ आरोग्य सेविका व १ आरोग्य सेवकाचे पद मंजूर आहे. जेणेकरुन गावातील प्रत्येक घराशी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संपर्क राहावा व कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यांना लाभ मिळावा. परंतु

ठळक मुद्देसुदूर भागातील नागरिक भगवान भरोसे : काही ठिकाणी कंत्राटींच्या भरवशावर उपकेंद्रांचा भारआरोग्य सेवा सलाईनवर - भाग : ४

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २२ उपकेंद्र आहेत. प्रत्येक उपकेंद्रात शासनाकडून २ आरोग्य सेविका व १ आरोग्य सेवकाचे पद मंजूर आहे. जेणेकरुन गावातील प्रत्येक घराशी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संपर्क राहावा व कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यांना लाभ मिळावा. परंतु सुदूर भागातील अनेक उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांचे पद रिक्त असून त्या परिसरातील अनेक गावांमध्ये आरोग्य सेवा ‘नॉट रिचेबल’ झालेली आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील जमाकुडो, पिपरीया, मानागड सारख्या उपकेंद्रांतील अतिदुर्गम भागातील दर्जनो गावे आरोग्य सेवेपासून कोसो दूर आहे. दुर्गम भागातील नागरिकांचे आरोग्य आजही भगवान भरोसे अवलंबून आहे.दरेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जमाकुडो उपकेंद्रात एकूण ८ गावांचा समावेश असून या गावांतील लोकसंख्या ४४ हजार ४१९ आहे. परंतु या उपकेंद्रात नियमित ८ गावांतील आरोग्य आणि गृहभेटीची जबाबदारी एका कंत्राटी आरोग्य सेविकेच्या हाती आहे. तीच परिस्थिती पिपरीया उपकेंद्राची आहे. येथेही ५ हजार लोकांच्या एकूण १४ गावांनी जबाबदारी एका कंत्राटी आरोग्य सेविकेच्या भरवशावर आहे. त्या आरोग्य सेविकेला १४ गावांमध्ये भेट, सतत आरोग्य विषयक बैठका, शासनाचे इतर उपक्रम राबविणे, रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, प्रसुती करणे इत्यादी कामे सुद्धा करावयाची असतात. अशात अनेक गावे कित्येक महिने ‘नॉट रिचेबल’ असतात. याच आरोग्य केंद्रात आमगाव खुर्द आणि सालेकसा या तालुका मुख्यालयातील भागांचा समावेश असून या उपकेंद्रात आरोग्य सेवकच नाही. तर या क्षेत्रातील मुरुमटोला, जांभळी, सालेकसा (जुना) इत्यादी गावांमध्ये आरोग्य सेवकांच्या भेटी होतच नाही.विशेष म्हणजे, वरील तिन्ही उपकेंद्र १० ते २० किमी. लांब व जंगल व्याप्त भागात असून सुद्धा या गावांमध्ये आरोग्य कर्मचारी लाभत नसून शासन आदिवासी भागातील आरोग्य सेवेबद्दल किती गंभीर आहे हे लक्षात येते.बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घनदाट जंगल क्षेत्र व अतिदुर्गम भागात असलेल्या मानागड उपकेंद्रात आरोग्य सेवकांची सोय नाही. तसेच लोहारा उपकेंद्रात सुद्धा आरोग्य सेवक नसल्याने या परिसरातील लोक आरोग्य विभागापासून दूरच राहतात. त्याच प्रमाणे तिरखेडी व बिजेपार या गावांमध्ये उपकेंद्रांतर्गत आरोग्य सेविकांचे पद रिक्त आहेत. त्यामुळे प्रसुतीसाठी ताबडतोब सोय लाभत नाही.कावराबांध आरोग्य केंद्रांंतर्गत लटोरी आणि सोनपुरी येथील उपकेंद्रात आरोग्य सेवक आणि सेविका दोघांचे पद रिक्त असल्याने सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या या भागात आरोग्य सेवा ‘आॅक्सीजन’वर आहे. लटोरी येथील एक कंत्राटी आरोग्य सेविका ५ गावांची जबाबदारी सांभाळत असून अनेक वेळा तिला लोकांच्या रोषाला सामना करावा लागतो. सातगाव आरोग्य केंद्रांंतर्गत भजेपार आणि धानोली उपकेंद्रात आरोग्य सेवक नसल्याने वाघनदी पार करुन जावे लागत असून येथील लोकांना आरोग्य सुविधेपापासून वंचित राहावे लागते. भजेपार येथील उपकेंद्र नुकतेच स्थापित झाले परंतु तेथे आतापासून आरोग्य कर्मचाºयांचा वानवा असल्याने उपकेंद्र उघडण्याचा काय अर्थ असे बोलले जात आहे. सालेकसा तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्र मिळून एकूण ९० हजारावर लोकसंख्या असून आजही ३० टक्के लोक थेट आरोग्य सुविधेपासून वंचित राहत आहेत. किंवा त्यांच्या दारापर्यंत आरोग्य विभाग पोहूच शकत नाही.नवीन आरोग्य केंद्र केव्हा सुरू होणार?तालुक्यात गोर्रे येथे नवीन आरोग्य केंद्र मंजूर झाले. परंतु वर्ष लोटूनही येथील आरोग्य केंद्र सुरु झाले नाही. दरेकसा येथे आरोग्य केंद्राची नवीन इमारत बनत असून बांधकाम संथ गतीने चालत असल्यामुळे येथील आरोग्य केंद्र जमाकुडो उपकेंद्रात चालत आहे. जागेच्या अभावी अनेक बाबतीत अडचण होत आहे. शासनाने मुरकुटडोह दंडारी भगात नवीन उपकेंद्र मंजूर केले परंतु तेही सुरु झाले नाही. ही गावे नेहमी शासनाच्या सेवेपासून वंचित राहत आली आहेत. तसेच टोयागोंदी किंवा विचारपूर येथे सुद्धा उपकेंद्राची मागणी पूर्ण झालेली नाही.

टॅग्स :Healthआरोग्य