शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

रस्त्यात खड्डे नव्हे, खड्ड्यात रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:24 PM

गावातील रस्ते गुटगुटीत झाले आहेत. मात्र ज्या रस्त्यांच्या माध्यमातून कर मिळतो,अशा रस्त्यांची मात्र दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजवा अभियान शासन राबविते. मात्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांना जिल्ह्यातच रस्त्यांची अशी दूरवस्था बघावयाला मिळते.

ठळक मुद्देवडसा-कोहमारा राज्य महामार्गाची दुर्दशा : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गावातील रस्ते गुटगुटीत झाले आहेत. मात्र ज्या रस्त्यांच्या माध्यमातून कर मिळतो,अशा रस्त्यांची मात्र दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजवा अभियान शासन राबविते. मात्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांना जिल्ह्यातच रस्त्यांची अशी दूरवस्था बघावयाला मिळते. वडसा-कोहमारा राज्य महामार्गावर रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे कळायला मार्गच नाही.गोंदिया-गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा वडसा-कोहमारा हा मार्ग आहे. या मार्गाने मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल राज्यातून आंधप्रदेश राज्याकडे वाहतूक होते.या मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी दरवर्षी लाखोंचा रुपयांचा खर्च केला जातो.परंतु पुन्हा खड्डे जैसे थे राहत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी आतापर्यंत जेवढा खर्च झाला तेवढ्याच खर्चात नवीन रस्ते तयार झाले असते, असे या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे म्हणणे आहे. या रस्त्यावर विशेषत: खामखुरा ते गौरनगरच्या पुढे पर्यंत प्रवास करताना जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागतो.गतवर्षी याच मार्गाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी दौरा केला होता. ते या मार्गाने येणार असल्याची खात्री पटल्यानंतर रात्रंदिवस एक करुन अधिकाऱ्यांनी या रस्त्यारील खड्डे बुजवूज अगदी नववधुसारखी सजावट केली होती. जर मंत्री महोदयांच्या आगमनाप्रित्यर्थ रस्ते गुटगुटीत होत असतील तर या जिल्ह्याचे पालकमंत्री ना.परिणय फुके यांनी सुद्धा एखादा दौरा करुन बघावा अशी जनतेची मागणी आहे.२००९ ते २०१४ या शासन काळात काँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता होती. त्यावेळी राजकुमार बडोले हे भाजपचे आमदार होते. आघाडी सरकार विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी देत नसल्याची खंत त्यांनी यावर केली होती.मात्र २०१४ ते २०१९ या काळात ते मंत्री होते. मात्र ते सुद्धा या रस्त्याचा कायापालट करु शकले नाही.गतवर्षी राष्टÑवादी काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेने याच रस्त्यावर बेशरमची झाडे लावून शासनाचे लक्ष वेधले होते. तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र अजुनही रस्त्याची दुर्दशा तशीच आहे.आसोली या गावाच्या पुढे या रस्त्याने वाहतूक करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे.दुचाकीस्वारांशी तर अनेकदा प्रकार घडले आहेत.या राज्य महामार्गाचे नवीनीकरण न करण्याचे गौडबंगाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. या विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा केली असता लवकरच रस्ता तयार होणार अशी राजकीय मंडळीसारखी कोरडी आश्वासने देतात. या सर्व प्रकारामुळे खड्डेमुक्त महाराष्टÑ या शासनाच्या योजनेचे श्राद्ध करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके यांच्याकडून जनतेच्या बºयाच अपेक्षा आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक