लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध दारु विक्री जोरात सुरू आहे. यामुळे गावातील वातावरण कलुषीत होत आहे.महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे कालीमाटी येथील महिलांनी विशेष ग्रामसभेत दारुबंदी करण्याचा ठराव पारीत केला.गावात अवैध दारु विक्रेत्यांना महिलांनी नोटीस बजावून दारु विक्री बंद करण्याची सूचना केली आहे.कालीमाटी येथे बचत गटाच्या महिलांनी व दारुबंदी समितीच्या महिलांनी एकत्र येऊन अवैध दारु विक्रीवर आळा घालण्यासाठी विशेष ग्रामसभेत दारुबंदी करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी बचत गटाच्या महिला, दारुबंदी समितीच्या महिला दारुबंदी समिती अध्यक्ष मंगला साखरे, तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष शोभा येवलकर, सरपंच शिवकुमार रहांगडाले, ग्रामपंचायत सदस्य मनोज बोपचे,स्वर्ण राहंगडाले आणि गावकरी उपस्थित होते.विशेष ग्रामसभेत दारुबंदीच्या विषयावर चर्चा करु न अवैध दारु विक्र ी बंदीचा निर्णय घेऊन ठराव मंजूर केला. घेतलेल्या ठरावानुसार दारुबंदी समितीच्या महिलांनी पोलिसांनी या परिसरातील अवैध दारु विक्री ७ दिवसात बंद करण्याची मागणी केली.अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. कालीमाटी येथे दारु विक्री जोमात सुरु असल्याने अल्पवयीन व तरुण व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे गावातील वातावरण कलुषीत होत आहे. यामुळे गावातील शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी याची त्वरीत दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.सरपंच शिवकुमार रहांगडाले, उपसरपंच, महिला बचत गट, दारुबंदी समिती कालीमाटी यांच्या सहकार्याने दारु विक्र ी बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला.या निर्णयाचे सर्व गावकऱ्यांनी स्वागत केले.
अवैध दारु विक्रेत्यांना महिलांनी बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 6:00 AM
विशेष ग्रामसभेत दारुबंदीच्या विषयावर चर्चा करु न अवैध दारु विक्र ी बंदीचा निर्णय घेऊन ठराव मंजूर केला. घेतलेल्या ठरावानुसार दारुबंदी समितीच्या महिलांनी पोलिसांनी या परिसरातील अवैध दारु विक्री ७ दिवसात बंद करण्याची मागणी केली.अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
ठळक मुद्देविशेष ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव मंजूर । कालीमाटी येथील महिलांचा पुढाकार