शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
2
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
3
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
4
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
5
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
6
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
7
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
8
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
9
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
10
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
11
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
12
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
13
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
14
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
15
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
16
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
17
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
18
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
19
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
20
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल

आता खासगी प्रवासी वाहनांची २५ टक्के दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:32 AM

गोंदिया : मागील दीड वर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्याने याचा विविध व्यवसायांवर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे नागरिकांचे बाहेरगावी जाणे-येणे बऱ्याच ...

गोंदिया : मागील दीड वर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्याने याचा विविध व्यवसायांवर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे नागरिकांचे बाहेरगावी जाणे-येणे बऱ्याच प्रमाणात कमी झाले. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांची मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी झाली. आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, सर्वच व्यवहार जवळपास रुळावर आले आहेत. मात्र, टॅक्सी व्यवसाय अद्याप रूळावर आला नाही. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने परिणामी टॅक्सी सर्व्हिसच्या संचालकांनी प्रतिकिलोमीटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. आता संसर्ग आटोक्यात आला असून, पर्यटनस्थळे गर्दीने फुलू लागली आहेत. तर नागरिकांचे बाहेरगावी येणे-जाणेदेखील सुरू झाले आहे. पण, टॅक्सीच्या दरवाढीमुळे ग्राहकांची टॅक्सीची मागणी थोडी कमी झाली आहे. दीड वर्षात जवळपास ७ ते ८ महिने वाहतुकीवर निर्बंधच होते. त्यामुळेसुद्धा टॅक्सी व्यवसाय डबघाईस आला होता. आता सर्व व्यवहार सुरळीत झाले असून, पर्यटनस्थळे गर्दीने फुलू लागली आहेत. पण टॅक्सीच्या दरवाढीमुळे अनेक जण टॅक्सीची मागणी करीत नाहीत. टॅक्सीची देखभाल दुरुस्ती, चालकाचे वेतन, टॅक्सेस याशिवाय इतर खर्च येत असल्याने टॅक्सीच्या दरात वाढ करावी लागत असल्याचे टॅक्सी संचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

............

टॅक्सीचे दर प्रतिकिलोमीटर

डिझायर - १२ रुपये

इनोव्हा : १३ रुपये

क्रेस्टा : १४ रुपये

१७ सिटर ट्रॅव्हलर : २४ रुपये

....................

पेट्रोल - डिझेल दर (प्रतिलीटर) रुपयात

पेट्रोल डिझेल

जानेवारी २०१९ - ७४.६९ ६५.४१

जानेवारी २०२० - ८०.४० ७२.००

जानेवारी २०२१- ९०.८० ८९.०२

ऑगस्ट २०२१ - १०७.०० ९५.००

..............................................

गाडीचा हप्ता भरणार कसा?

मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. याचा फटका आमच्या टॅक्सी व्यवसायालासुध्दा बसला आहे. त्यात पेट्रोल - डिझेलचे दर वाढल्याने ग्राहकांनीसुद्धा आमच्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मला टॅक्सीचा हप्ता भरणे कठीण झाले आहे.

-विनोद माकोडे, टॅक्सीचालक

...............

टॅक्सी व्यवसायाची गाडी अद्याप रुळावर आलेली नाही. त्यामुळे वाहन चालकाचे वेतन, हप्ते आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात टॅक्सीचे भाडे वाढविल्याने ग्राहक मिळणे कठीण झाले आहे.

- दिवाकर नारायण, टॅक्सीमालक

.............