शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

आता नजरा ‘रॅँकिंग’कडे

By admin | Published: February 01, 2017 12:31 AM

शहरातील स्वच्छता विषयक काय सोयी उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे हे जाणून

शहर स्वच्छता सर्वेक्षण : रॅँकिंगवरून कळणार शहराची स्थिती कपिल केकत ल्ल गोंदिया शहरातील स्वच्छता विषयक काय सोयी उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे हे जाणून घेण्यासाठी शहरात १७ ते १९ जानेवारी दरम्यान स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून हे सर्वेक्षण करण्यात आले असून यात पाच घटकांवर आधारीत प्रश्नावलीत नोंद घेण्यात आली. आता या नोंदींवरून शहराचे ‘रँकींग’ केले जाणार असून त्या आधारे आपले शहर राज्यात कोणत्या स्थानावर आहे हे कळणार. त्यामुळे आता नगर परिषदेच्या नजरा स्वच्छता सर्वेक्षणाच्या या ‘रँकींग’कडे लागल्या आहेत. अवघ्या देशाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छता मिशन राबविले जात आहेत. त्यातंर्गत टप्याटप्याने काही ना काही नवनवे प्रयोग करून देशवासीयांत स्वच्छतेबाबत जागरूकता आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वच्छतेप्रती आपली जबाबदारी जाणून घेतल्याशिवाय शासनाचे हे प्रयत्न फलितास येणार नाहीत. त्यामुळे देशवासीयांना जागरूक करून त्यांचा सहभाग मिळवून घेण्यासाठी ही सर्व खटाटोप सुरू आहे. यात नागरिकांना काय हवे आहे हे सुद्धा जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे. यातूनच केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून राज्यात स्वच्छता सर्वेक्षण हा प्रयोग केला गेला व त्यात ४४ शहरांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वच्छता सर्वेक्षणाचा हा दुसरा टप्पा होता व त्यात १७ ते १९ जानेवारी दरम्यान कमलेश मिशाद व अंजन यादव यांनी शहराचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणांतर्गत गुणवत्ता नियंत्रण विभागाने नगर परिषदेकडून शहरातील संपूर्ण स्थिती जाणून घेत तशी माहिती मागवून घेतली होती. या माहितीच्या आधारे विभागाकडून मिशाद यांना सूचना दिल्या जात होत्या व त्यानुसार मिशाद यांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली. तर यादव यांनी त्यांना देण्यात आलेल्या प्रश्नावलीत विविध घटकांची नोंद करून त्याचे पुरावे नगर परिषदेकडून घेतले. विशेष म्हणजे अशाच प्रकारे अन्य शहरांतही विभागाच्या पथकाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. पथकाकडून करण्यात आलेल्या पाहणी व प्रश्नावलीतील नोंदी व पुराव्यांच्या आधारावर आता शहराचे ‘रँकींग’ केले जाणार आहे. या ‘रँकींग’वरूनच आपले शहर राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे व आपण कोणत्या घटकात मागे असून कोणत्या घटकात शहराची काय स्थिती आहे हे कळणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा ‘रँकींग’कडे लागल्या आहेत. या घटकांवर होते प्रश्न ४गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून देण्यात आलेल्या प्रश्नावलीत पाच घटकांवर आधारीत प्रश्नांचा समावेश होता व एकूण २०० गुणांची ही प्रश्नावली होती. यात घन कचरा व्यवस्थापन, घन कचरा प्रक्रीया व विल्हेवाट, वैयक्तीक व उघड्यावरील शौच, क्षमता बांधणी व प्रचार-प्रसार या पाच घटकांवर आधारीत प्रश्न होते. पथकाने या सर्व घटकांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच प्रश्नावलीत तशा नोंदी केल्या. एवढेच नव्हे तर यासाठी नगर परिषदेकडे असलेले पुरावे सुद्धा पथकाने घेतले. ही संपूर्ण माहिती व पुरावे पथक आपल्या सोबत घेऊन गेले आहे व त्याआधारे आता शहराला किती गुण मिळतात यावरच त्या शहराची ‘रँकींग’ केली जाणार आहे. ‘रँकिंग’चा असा होणार फायदा ४विभागाकडून देण्यात आलेल्या पाच घटकांच्या प्रश्नावलीच्या आधारे शहराची ‘रँकींग’ केली जाणार आहे. यावरून आपले शहर राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे हे कळणार आहे. शिवाय पाच घटकांमधील कोणत्या घटकात किती गुण मिळाले व कोणत्या घटकात शहर माघारले हे सुद्धा कळणार आहे. तर कमी गुण असलेल्या घटकांच्या पुर्ततेसाठी शासनाकडून पुढे निधी दिला जाणार असल्याची माहिती आहे. एकंदर या स्वच्छता सर्वेक्षणातून शहराला कोणत्या घटकात आणखी कार्य करण्याची गरज आहे हे स्पष्ट होणार आहे.