शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

आता पुरूषही सरसावले कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 10:28 PM

कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया म्हटली तर कुटुंबातील पुरूष महिलेलाच समोर करतो. स्वत: मात्र ही शस्त्रक्रिया करायचे टाळतो.

ठळक मुद्देतिरोडा उपजिल्हा रूग्णालय : एकाच दिवशी ५१ पुरूषांवर नसबंदीची शस्त्रक्रिया

ऑनलाईन लोकमतगोंदिया : कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया म्हटली तर कुटुंबातील पुरूष महिलेलाच समोर करतो. स्वत: मात्र ही शस्त्रक्रिया करायचे टाळतो. त्यामुळेच कुटुंब नियोजनासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमात स्त्रियांचा सहभाग ९० टक्केपेक्षा जास्त राहिला आहे. मात्र आता शस्त्रक्रियेची अत्याधुनिक पद्धती व पुरूषांमध्ये होणारी जनजागृती व मतपरिवर्तनामुळे आता पुरूषही कुटुंब नियोजनासाठी नसबंदी शस्त्रक्रियेकडे सरसावल्याचे चित्र आहे. तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात घेण्यात आलेल्या शिबिरात एकाच दिवशी तब्बल ५१ पुरूषांनी नसबंदी (बिन टाका) शस्त्रक्रिया केली.कुटुंब नियोजन या राष्ट्रीय कार्यक्रमात पुरूषांचा सहभाग वाढावा, वाढत्या लोकसंख्येला आळा बसावा व बेरोजगारीला नियंत्रणात आणण्यासाठी कुटुंब नियोजन एकमात्र पर्याय आहे. याच उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभाग व तिरोडा तालुकास्तरीय सर्व शासकीय विभागांच्या सहकार्याने उपजिल्हा रूग्णालयात पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. पुरूष नसबंदी कमी त्रासाची, कमी वेळेची व अधिक मोबदला मिळणारी शस्त्रक्रिया आहे. त्यासाठी भरती होण्याची गरज नाही. कुठल्याच प्रकारची शारीरिक कमजोरी येत नाही. चिरा नाही, टाका नाही, विशेष तंत्रज्ञानाने ही शस्त्रक्रिया केली जाते.शिबिरात ५१ पुरूष नसबंदीच्या शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात यशस्विरित्या करण्यात आल्या. शिबिराच्या उद्घाटकीय कार्यक्रमात डॉ. सुनील गौतम (ईओएच तिरोडा) यांनी प्रेरणादायक पद्धतीने मार्गदर्शन करून शिबिरात सहभागी पुरूष व मत परिवर्तकांना प्रोत्साहन दिले. शिबिरासाठी तालुकास्तरीय सर्व अधिकाºयांचा समन्वय घडवून आणला. उद्घाटन अदानी फाऊंडेशनचे नितीन शिराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. इद्रिस शेख यांनी मार्गदर्शन केले.या वेळी उपविभागीय अधिकारी तलपाडे यांनी शिबिराला भेट देवून निरीक्षण केले. कुटुंब नियोजन कार्यक्रमाबाबत दोनदा राष्टÑीय पुरस्कार मिळविणारे डॉ. विजय वानखेडे यांनी आपले विचार व्यक्त करून शिबिरार्थी व वैद्यकीय चमूचा उत्साह वाढविला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय पाटील उपस्थित होते.कुटुंब नियोजनाच्या नवीन तंत्रासाठी चीनला भेट देवून येणारे गोंदियाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी सुद्धा शस्त्रक्रिया शिबिराला भेट दिली.शिबिरासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हा रूग्णालयाची व्यवस्थापकीय चमू डॉ. कंचन रहांगडाले, ओपीडी इंचार्ज डॉ. अनिल आटे, वंदना गौतम, वैद्यकीय तपासणी प्रभारी डॉ. आशिष बन्सोड, फॅसिलिटी मॅनेजर कमलेश शुक्ला, औषध वितरक मेघा शिरसोदे, प्रयोगशाळा सहायक क्रिशमोहन रच्चा, आॅपरेशन थिएटर इंचार्ज संघमेश मंगलूर, सहायक वैद्यकीय अधीक्षक एन.ए. कुरेशी, अनमोल लोखंडे, आयसीटीसीचे गणेश तायडे यांनी सहकार्य केले.