कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षण किंवा व्यापाराला घेऊन कित्येकांना परदेशात मुक्कामी जावे लागते. अशात त्यांना परदेशात वाहन चालविण्यासाठी परवाना लागतोच. मात्र यासाठी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढावे लागत असून त्याची मुदत सामान्यत: १ वर्षाची असते. अशात इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स मुदत संपल्यास व संबंधित परदेशात असल्यास त्यांची गैरसोय होऊ शकते. नेमकी हीच बाब धरून आता शासनाने परदेशात इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणाची सुविधा त्या-त्या देशातील भारतीय दूतावासात करून दिली आहे. (Now renew your international driving license abroad)
मात्र नागरिकांना याहीपेक्षा जास्त सुविधा परिवहन विभागाकडून पुरविली जात आहे. यासाठी संबंधित व्यक्तीला विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावयाचा आहे. अशात त्यांना कोठेही न जाता इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण ऑनलाइन करवून घेता येणार आहे.असे काढा इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स१- इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स, ३ पासपोर्ट आकाराचे फोटो, मेडिकल सर्टिफिकेट द्यायचे आहेत.२- विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट या कागदपत्रांसोबत द्यावा लागणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांचा व्हिसाचा पुरावा सादर करावा लागेल. तसेच यासाठी एक हजार रुपये शुल्क भरावे लागते.३- त्यानंतर विभागाकडून संपूर्ण प्रक्रिया करूनच संबंधित व्यक्तीला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. विशेष म्हणजे यासाठी अन्यत्र कोठेही जाण्याची गरज नसते.४- इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स देताना संबंधित व्यक्ती किती कालावधीसाठी परदेशात जात आहे हे बघून लायसन्स दिले जाते.कोण काढतो हा परवानासामान्यत: इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स सामान्य व्यक्ती काढत नाही, कारण त्यांच्या कामाचे ते नाहीच. मात्र आता परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शिवाय कित्येकांचे व्यापार परदेशात असल्यास किंवा कामानिमित्त त्यांना परदेशात ये-जा करावी लागत असल्याने अशा व्यक्ती इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढतात. विशेष म्हणजे, व्यापारासाठी जाणारे नागरिक जास्त कालावधीसाठी जात नसल्याने अशांना १ वर्षांचा व्हिसा दिला जातो. व्हिसासोबतच इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपते. मात्र शिक्षणासाठी किंवा जास्त कालावधीसाठी जात असलेली व्यक्ती ५ वर्षांसाठी किंवा व्हिसा कधी संपतो त्यानुसार इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढतात.इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची सुविधा आता त्या-त्या देशातील भारतीय दूतावासात उपलब्ध करवून दिली जात असली तरीही प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करूनही त्यांना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढता येते. परदेशातील व्यक्तींसाठी अत्यंत सुविधाजनक मार्ग आहे.- विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया