कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाजारातील दुकानदारांकडून भाजी विक्रेत्यांच्या होत असलेल्या शोषणाला आता पूर्ण विराम लागणार आहे. कारण, जुन्या बाजार समितीत आता भाजी व फळ बाजार स्थानांतरीत करून त्यांना हक्काची जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास सध्याच्या भाजी बाजारात होणारी भाजी विक्रेत्यांची लुट थांबून त्यांचा पैसाही वाचणार आहे.सध्या भाजी बाजारात भाजी विक्रेत्यांना दुकानांसमोर आपली दुकान थाटावी लागत आहे. यासाठी मात्र दुकानदार या भाजी विक्रेत्यांकडून दुकान लावू देण्यासाठी काही ठरावीक रक्कम दररोज घेतात. शिवाय त्यांच्याकडून भाजीपालाही फुकटात घेतात. एवढेच नव्हे तर भाजी विक्रेत्यांचा माल उरल्यास आपल्या दुकानात ठेऊ देण्यासाठी पैसे घेऊन त्यातूनही माल काढून घेत असल्याचे प्रकार ऐकीवात आहेत. ग्रामीण भागातून येऊन येथे भाजी विकल्यानंतर या प्रकारामुळे भाजी विके्रत्यांच्या हाती मोजकाच पैसा येतो.भाजी विक्रेत्यांचे हे शोषण थांबविता यावे यासाठी येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर भाजी बाजार स्थानांतरीत करण्याची संकल्पना आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या डोक्यात आली. यांतर्गत येथील जुन्या बाजार समितीतील सध्याचे बांधकाम पाडून तेथे मोठे शेड तयार केले जाणार आहे. यासाठी बाजार समिती प्रशासनाने पणन संचालकांकडे प्रस्ताव पाठविला असून लवकरच त्याला मंजुरी मिळल्यानंतर काम सुरू होणार असल्याचीही माहिती आहे.बाजार समितीत तयार करण्यात येणाऱ्या या शेडमध्ये भाजी व फळ विक्रेत्यांना नाममात्र दर आकारून दुकान लावण्यासाठी जागा दिली जाणार आहे. येथे भाजी विक्रेत्यांसाठी वीज व बसण्याची सोय करून दिली जाणार असून शिवाय त्यांच्याकडे उरलेला भाजीपाला किंवा फळ ठेवण्यासाठी बाजार समितीत व्यवस्था केली जाणार आहे. फक्त नाममात्र दर आकारून ही सोय दिली जाणार असून या पैशांतून खर्च काढला जाईल.शेड व कोल्ड स्टोरेजसाठी ४ कोटींचा निधीजुन्या बाजार समितीच्या जागेवर भाजी व फळबाजार स्थानांतरीत करण्याच्या कामाला गती मिळत असतानाच या बाजार समितीच्या जागेवर शेड व कोल्ड स्टोरेज तयार करण्यासाठी वैशिष्ट पूर्ण योजनेंतर्गत चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येथे कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध झाल्यास भाजी विक्रेत्यांची मोठी समस्या दूर होणार आहे.मेहनतीचे फळ मिळणारजुन्या बाजार समितीत भाजीबाजार गेल्याने भाजी विक्रेत्यांची होत असलेली लूट थांबणार. अशात त्यांच्या हाती चार पैसे उरणार व गावातून ये-जा करण्याची त्यांची मेहनत फलीतास येणार. पैसा हाती उरणार असल्याने त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळणार आहे.
भाजी विक्रेत्यांना मिळणार आता हक्काची जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:50 PM
बाजारातील दुकानदारांकडून भाजी विक्रेत्यांच्या होत असलेल्या शोषणाला आता पूर्ण विराम लागणार आहे. कारण, जुन्या बाजार समितीत आता भाजी व फळ बाजार स्थानांतरीत करून त्यांना हक्काची जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ठळक मुद्देजुन्या बाजार समितीत स्थानांतरण : नाममात्र शुल्कावर मिळणार सुविधा