दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यात मार्च महिन्यात आलेल्या वादळी वारा व गारिपटीमुळे जवळपास हजारो पोपटांचा कंटगी धरणाजवळ वनविभागाच्या सागवान रोपवनात मृत्यू झाला होता. एकेकाळी पक्ष्यांची शाळा येथे भरायची, पण १३ मार्चला आलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे सर्व काही उध्दवस्त झाले होते. कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे प्रदूषणात सुध्दा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात सुध्दा चांगले बदल घडून येत असून रानावनात आणि गावाजवळ पक्ष्यांची किलबिलाट पुन्हा ऐकायला येऊ लागली आहे. कटंगी जलाशयाजवळ पक्ष्यांची शाळा भरु लागल्याने पक्षी प्रेमींसाठी ही पर्वणीच ठरत आहे.कटंगी धरणाजवळ वनविभागची पन्नास एकरमध्ये सागवानचे रोपवन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पोपटांसह इतर पक्ष्यांचे वास्तव्य दिसत होते. मात्र १३ मार्चला आलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे जवळपास हजारो पक्षी मूत्यूमुखी पडले. जंगलात अक्षरश: मृत पोपटांचा सडा पडलेला दिसत होता. निसर्ग प्रेमींनीही पोपटांची वसाहत नेहमीसाठी इतिहासजमा होणार अशी भीतीही व्यक्त केली होती. पण अलीकडेच या ठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी, पोपट, चिमणी, कावळे पाहयला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी कायदा लागू करण्यात आली आहे.लॉकडाउनमुळे माणूस घरातच बंदिस्त झाला.त्यामुळे वातावरणात चांगले बदल पाहायला मिळत आहे. प्रदूषण कमी झाल्याने पक्ष्यांना शुद्ध व आल्हाददायक वातावरणात मुक्त संचार करता येत आहे.वास्तविक लॉकडाउनच्या काळात पशू-पक्ष्यांसाठी सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. कटंगी येथे मोठे धरण आहे. या धरणाजवळ वनविभागाचे मोठे जंगल आहे.या जंगल परिसरात पक्षांची शाळा भरते. मागील आठवडाभरापासून या ठिकाणी पक्ष्यांची पुन्हा किलबिलाट ऐकू येऊ लागली आहे.निसर्ग मंडळ उभारणार पाणपोईयेथील निसर्ग मंडळाने कंटगी धरणाजवळ वनविभागाच्या सागवान रोपवनात पाणपोईची व्यवस्था करण्याचे ठरविले आहे. निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन यांनी दोन दिवसात वनविभागाच्या मदतीने या परिसरात शेकडो पाणपोई तयार करणार असे लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.लॉकडाउन व संचारबंदीमुळे तालुक्यातील जंगल परिसरात निरव शांतता पसरलेली आहे. प्रदूषण सुध्दा कमी झाले असून आल्हादायक वातावरण आहे. त्यामुळेच कटंगी धरणाजवळ पक्षाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.- प्रवीण साठवने, वनपरिक्षेत्राधिकारी,गोरेगाव
आता पुन्हा भरू लागली तिथे पक्ष्यांची शाळा; बदलत्या वातावरणाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 3:36 PM
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे प्रदूषणात सुध्दा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात सुध्दा चांगले बदल घडून येत असून रानावनात आणि गावाजवळ पक्ष्यांची किलबिलाट पुन्हा ऐकायला येऊ लागली आहे.
ठळक मुद्देपक्षी प्रेमींसाठी पर्वणीच,कटंगी परिसर फुलतोय