लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या कामांना आता सुरुवात झाली असून त्यासाठी विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची बीएलओ तसेच पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून निवडणूक कामांत दिरंगाई केली जात असल्याने अशांना मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.१२) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवडणूक कामात दिरंगाई करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता तयारीला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यातील सर्वच शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाते. त्यानुसार, सध्या मतदार यादी पुनर्रीक्षणाचे काम सुरू असून कित्येक कर्मचाऱ्यांची बीएलओ व पर्यवेक्षक म्हणून ड्यूटी लावण्यात आली आहे. मात्र संबंधीत कार्यालयातील आहे ती कामे हाताळतानाच मतदार पुनर्रीक्षण यादीसाठी ड्यूटी लावण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ होत आहे. न.प.च्या ५ कर्मचाऱ्यांचे मतदार यादी पुनर्रीक्षण कामाकडे दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीचे काम अत्यंत महत्वपूर्ण व जबाबदारीचे असल्याने त्यात दिरंगाई करणे महागात पडते. नेमकी हीच बाब हेरून मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.या नोटीसमधून त्यांनी कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनीधीत्व अधिनियम १९५० च्या कलम ३२ नुसार गुन्हा दाखल का करण्यात येवू नये याचे स्पष्टीकरण मागीतल्याची माहिती आहे.नगर परिषद कार्यालयात शुकशुकाटनगर परिषद कार्यालयातील बहुतांश कर्मचाऱ्यांची मतदार यादी पुनर्रीक्षण कामात बीएलओ व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातच आता मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी निवडणूक कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस धाडल्याने सर्वच कर्मचारी दहशतीत आले आहेत.त्यामुळे नगर परिषदेतील कर्मचारी आपापल्या कामाला लागले असून परिणामी नगर परिषदेत शुकशुकाट दिसून येत आहे.
न.प. कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 9:27 PM
लोकसभा निवडणुकीच्या कामांना आता सुरुवात झाली असून त्यासाठी विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची बीएलओ तसेच पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्देनिवडणूक कामातील दिरंगाई : थेट गुन्हा दाखल होणार