शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

कोरोनाबाधितांची संख्या झाली 40 हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 5:00 AM

शुक्रवारी (दि.२१) जिल्ह्यात ५०० बाधितांनी कोरोनावर मात केली, तर १३० नवीन रुग्णांची नोंद झाली. चार बाधितांचा उपचारांदरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचा ग्राफ वाढल्याने जिल्ह्यातून कोरोनाची लाट आता पूर्णपणे ओसरला लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. कोरोना ॲक्टिव रुग्णांची संख्यासुद्धा आता १४७८ आली असून, कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात आहे.

ठळक मुद्देकोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख उंचावला : बाधितांच्या संख्येत होतेय घट : दुसरी लाट ओसरली

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  :  मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र, त्यानंतर पुन्हा संसर्गात वाढ होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ एक रुग्ण संख्या असलेल्या गोंदिया जिल्ह्यात १४ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४० हजार रुग्णांची नोंद झाली. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे यापैकी ३७८८६ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे, तर आता कोरोनाची दुसरी लाटसुद्धा जिल्ह्यातून बऱ्यापैकी ओसरायला लागली आहे.शुक्रवारी (दि.२१) जिल्ह्यात ५०० बाधितांनी कोरोनावर मात केली, तर १३० नवीन रुग्णांची नोंद झाली. चार बाधितांचा उपचारांदरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचा ग्राफ वाढल्याने जिल्ह्यातून कोरोनाची लाट आता पूर्णपणे ओसरला लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. कोरोना ॲक्टिव रुग्णांची संख्यासुद्धा आता १४७८ आली असून, कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी मागील दीड महिना जशी काळजी घेतली तशीच काळजी पुढेसुद्धा घेत राहिल्यास कोरोना जिल्ह्यातून हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १५१३५४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२५६७९ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत १७९७३२ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १५९०३४ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४००२३ कोरोना बाधित आढळले असून, त्यापैकी ३७८८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १४७८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर १२५९ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.लसीकरण मोहिमेला आली गतीकोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा रामबाण उपाय असल्याने अधिकाधिक प्रमाणात लसीकरण करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १९ हजार ९४३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसींचा डोस प्राप्त झाल्याने आता लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरू आहे.

काेरोना रिकव्हरी दर ९४.६६ टक्केकोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या मागील आठ ते दहा दिवसांत वाढली आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी दरात वाढ झाली असून, ९४.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. तो राज्याच्या रिकव्हरी दरापेक्षा चार टक्क्यांनी अधिक आहे. कोरोना बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने मृत्युदर १.६२ टक्क्यावर पोहोचला असून, ही थोडी चिंताजनक बाब आहे.२२४७ चाचण्या १३० पॉझिटिव्हकोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यावर भर दिला जात आहे. याअंतर्गत शुक्रवारी एकूण २२४७ रॅपिड अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात १३० रुग्ण पॉझिटिव्ह आले. याचे प्रमाण ४.४७ टक्के आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या