लोकमत न्यूज नेटवर्कगोदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर पाच महिने रुग्ण वाढीचा दर आटोक्यात होता. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा बाधितांचा आकडा ७६०० वर पोहचला. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. मागील दहा दिवसात १८०० कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली तर ६६६ नवीन बाधितांची नोंद झाली. रुग्ण संख्येत घट झाल्याने चाचण्यांचे प्रमाण सुध्दा घटले आहे.सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या अधिक होती. जिल्ह्यात आतापर्यंत ३२८५६ कोरोनाच्या आरटीपीआर टेस्ट आणि २८७९० रॅपिड अॅटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. ७८१६ कोरोना बाधितांची नोंद झाली असून १०७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. ७०३२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. १ ते १० ऑक्टोबर दरम्यान कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट झाली असून रुग्ण बरे होण्याचा दर ८७.५२ टक्के झाला असून ही निश्चित जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. मागील दहा दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने कोरोना चाचण्यांचे प्रमाण सुध्दा कमी झाले आहे. बाधित रुग्ण कमी आढळत असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या सुध्दा कमी झाली आहे. सध्या एका कोरोना बाधित व्यक्तीमागे संपर्कात आलेल्या १५ लोकांची चाचणी केली जाते. कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी झाला आहे. हीच स्थिती राहिल्यास लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दररोज ५५० चाचण्यामागील दोन महिने रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याने दररोज २ हजारावर आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट केल्या जात होत्या. पण आता रुग्ण वाढीचा वेग मंदावल्याने दररोज ५५० आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्ट केल्या जात असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.१० हजार कीट येणार आजकोरोनाचा संसर्ग जरी आटोक्यात येत असला तरी पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्यास त्यावर वेळीच उपाययोजना करता याव्या, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने १० हजार रॅपिड अॅटीजेन टेस्ट कीट मागविल्या आहेत. या कीट सोमवारी (दि.१२) आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहेत.आरोग्य विभागाची त्रीसूत्री ठरतेय महत्त्वकोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने अधिकाधिक टेस्ट करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविणे ही त्रीसूत्री अवंलबली आहे.त्यामुळे याचे चांगले परिणाम दिसून येत असून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास मदत होत आहे. तसेच माझे कुटुंब माझी जवाबदारी या मोहिमेचा सुध्दा बराच फायदा झाला.
रुग्ण संख्येत घट झाल्याने चाचण्याचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 5:00 AM
सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या अधिक होती. जिल्ह्यात आतापर्यंत ३२८५६ कोरोनाच्या आरटीपीआर टेस्ट आणि २८७९० रॅपिड अॅटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. ७८१६ कोरोना बाधितांची नोंद झाली असून १०७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. ७०३२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
ठळक मुद्देसंसर्ग येतोय आटोक्यात : जिल्हावासीयांना मिळाला दिलासा