गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने खालावत असल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४२६७ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४००७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ७७ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण आहे.
मागील वर्षी सप्टेबर आणि ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला हाेता. त्यामुळे बाधितांचा आकडा दहा हजारावर गेला होता. मात्र नोव्हेंबरपासून कोरोना बाधितांच्या संख्येला बऱ्याच प्रमाण ब्रेक लागला. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाला पूर्णपणे उतरती कळा लागल्याने जिल्ह्यातून कोरोना पूर्णपणे हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यावर असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. बुधवारी जिल्ह्यात ५ कोरोनाबाधित आढळले तर ८ बाधितांनी कोरोनावर मात केली. बुधवारी आढळलेल्या ५ रुग्णांमध्ये ४ रुग्ण गोंदिया तालुक्यात तर १ रुग्ण तिरोडा तालुक्यातील आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ६७००२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५५३४४ नमुने निगेटिव्ह आले. तर कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ६६५३६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६०४०१ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४२६७ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४००७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ७७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडूृन प्राप्त व्हायचा आहे.
......
तीन तालुके कोरोनामुक्त तर आणखी दोन होण्याच्या मार्गावर
जिल्ह्यातील सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी हे तीन तालुुके कोरोनामुक्त झाले असून ग्रीन झोनमध्ये आले आहे. तर गोरेगाव आणि आमगाव तालुक्यात प्रत्येकी एक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून हे तालुके सुध्दा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. गोंदिया आणि आमगाव तालुक्यातच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे.