शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
2
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
3
१२ दिवसांपूर्वीच लेकीचं लग्न, 6 दिवसांआधी डॉक्टरांना मिळाली नोकरी; दहशतवाद्यांनी घेतला जीव
4
Hyundai India Share Price : Hyundai IPO नं केली गुंतवणूकदारांची निराशा, पण ब्रोकरेज मात्र बुलिश; लिस्टिंगलाच दिलं 'इतकं' टार्गेट
5
क्राइम पेट्रोलमध्ये पोलीस अन् खऱ्या आयुष्यात हातात बेड्या! प्रेमात वेडी झाली अभिनेत्री, बॉयफ्रेंडच्या भाच्याचंच केलं अपहरण
6
अनिल देशमुख यांनी तुरुंगात लिहिले पुस्तक; लवकरच होणार प्रकाशन
7
Laxmi Pujan Muhurta 2024: यंदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'धनलाभ' मुहूर्तावर 'असे' करा विधिवत पूजन!
8
लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?
9
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
11
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
12
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
13
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार
14
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
15
Share Market Today : शेअर बाजार सपोर्ट लेव्हलवर, दिवाळीपूर्वी होऊ शकते घसरण; अपर लेव्हलवर सेलर्स सक्रिय
16
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
17
Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
18
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
19
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?
20
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!

पोषण आहारासाठी मिळाले ३.१३ कोटी

By admin | Published: June 21, 2015 1:03 AM

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची शालेय उपस्थिती वाढण्यासोबत त्यांना सकस आहार मिळण्यासाठी शाळेतच मध्यान्ह भोजन मिळण्याची व्यवस्था शासनाने केली आहे.

गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची शालेय उपस्थिती वाढण्यासोबत त्यांना सकस आहार मिळण्यासाठी शाळेतच मध्यान्ह भोजन मिळण्याची व्यवस्था शासनाने केली आहे. यावर्षीही पोषण आहारासाठी जुनाच मेनू कायम ठेवला असून जुन्याच एजन्सीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या दिवशीपासून विद्यार्थ्यांना हा आहार मिळावा यासाठी ३ कोटी १३ लाखांचा निधीही जिल्ह्यातील शाळांसाठी देण्यात आला आहे.या पोषण आहाराला लागणारा खर्च २५ टक्के राज्य शासन तर ७५ टक्के केंद्र शासन देते. सन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रासाठी गोंदिया जिल्ह्यातील १३५३ शाळांमधील विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी गतवर्षीच्या मेनूत अद्याप कोणताही बदल केलेला नाही. पहिल्या दिवशीपासून पोषण आहार मिळावा यासाठी ३ कोटी १३ लाख २२ हजार रूपये जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. मागील वर्षी ज्या संघटनेने धान्याचा पुरवठा केला त्याच दि महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटीव्ह माकॅटींग फेडरेशनला दोन महिन्यासाठी पोषण आहार पुरवठ्याचा कंत्राट वाढवून देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील बालकांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारासाठी राज्य शासनाने पहिल्या टप्याची २५ टक्के रक्कम ७९ लाख ९० हजार तर केंद्र शासनाने ७५ टक्के रक्कम म्हणजे २ कोटी ३३ लाख ३२ हजार रूपये पाठविली आहे. १ लाख २८ हजार बालकांना मिळणार भोजनमध्यान्ह भोजन देण्याची सोय शासनाने केल्यामुळे यंदा गोंदिया जिल्ह्यातील एक लाख २८ हजार ३६ बालकांना मध्यान्ह भोजनाचा लाभ मिळणार आहे. वर्ग १ ते ५ वीे तील ७५ हजार १४७ तर वर्ग ६ ते ८ चे ५२ हजार ८८९ बालकांना मध्यान्ह भोजनाचा लाभ मिळणार आहे. या भोजनासाठी जुलै महिन्यासाठी निधी तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला आहे. प्राथमिक विद्यार्थ्यासाठी ३६ लाख ८२ हजार तर उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ३२ लाख ५३ हजार रूपये वितरीत करण्यात आला आहे. दरपत्रक निश्चितवर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्याना प्रत्येक विद्यार्थ्यामागे १०० ग्रॅम तांदूळ व इतर साहित्यासाठी ३.५० रूपये, वर्ग ६ ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी १५० ग्रॅम तांदूळ व इतर साहित्यासाठी ५.२० रूपये दिले जातात. शासनाने या शालेय पोषण आहारात कोणकोणते साहित्य द्यावे ते प्रपत्रात नमूद करूनही प्रत्येक वस्तूचे दरही ठरवून दिले आहे. मूगडाळ ८४ रूपये किलो, मसूर डाळ ७३ रूपये किलो, तूर डाळ ८४.५० रूपये किलो, हरभरा ४८ रूपये किलो, चवळी ६१.७५, मटकी ६९, मूग ७८, वाटाणा ५९, सोयाबीन तेल ९९, कांदा, लसून १८५, हळद १९०, मीठ ९, जिरे १८०, मोहरे ५२ रूपये प्रतिकिलो असे दर ठरविण्यात आले आहे.