लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : सन १९३१ नंतर जातीनिहाय जनगणना करण्यात आली नाही. त्यामुळे ओबीसींची लोकसंख्या किती आहे हे कळायला मार्ग नाही. प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे हे माहिती करुन घेण्याकरिता जातीनिहाय जनगणना होणे महत्वाचे असून बहुजनांनी जातीनिहाय जनगणनेचे कॉलम असेल तर जनगणनेला सहकार्य करा अन्यथा बहिष्कार करा. ओबीसींनी आपसातील मदभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने संवैधानिक अधिकार मिळू शकतील असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.युवा कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानात आयोजित कुणबी समाजाच्या अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वरिष्ठ समाजसेवक काशीराम शिवणकर होते. उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उषा मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, विजय बहेकार, अमर वऱ्हाडे, नामदेव किरसान, नटवरलाल गांधी, सरपंच कल्पना बहेकार, प्रभाकर दोनोडे, तुकाराम बोहरे, रमेश चुटे, सभापती दिलीप वाघमारे, डॉ. संजय देशमुख, राजू काळे, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, कमल बहेकार, युगराम कोरे, भूमेश्वर मेंढे, इंदू कोरे, अजया चुटे, वंदना काळे, माजी सरपंच रेखा फुंडे, डॉ. अजय उमाटे, संतोष अग्रवाल, संतोष बोहरे, संजय दोनोडे, शमलाल दोनोडे, डॉ. वाळके, देवराम खोटेले, उपसरपंच फुंडे, पुरुषोत्तम कोरे, टी.जी.फुंडे, प्रा. दखणे, प्रा. काटेखाये, प्रा. भदाडे, एस.के. कोरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकोबा, सुभाषचंद्र बोस यांच्या छायाचित्रांना पूजन करून झाली.पुढे बोलताना पटोले यांनी, पुढील वर्षी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे सांगितले. शासनाने पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची पद्धतनी बंद केली. पीकविमा योजनेत बदल करण्यात येईल हे ही सांगितले. बहुजनांनी पैसे घेवून मते विकण्याची परंपरा निवडणुकीत बंद केली पाहिजे. अन्यथा फक्त पैसेवालेच सत्तेत येतील. लोकशाहीत जनतेची भूमिका महत्वपूर्ण असते. विधानसभा अध्यक्षाच्या रुपाने लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी राजदंड वापरण्याची ताकद आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला खºया अर्थाने न्याय देण्याची माझी भूमिका राहील, असेही त्यांनी सांगीतले.समितीकडून जाहीर सत्कारयाप्रसंगी समितीच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल नाना पटोले यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सोबतच साखरीटोला येथील विविध संघटना, संस्था व शाळा-कॉलेजच्यावतीने भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन सुद्धा देण्यात आले. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या कुणबी समाजातील तरुणांचा पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ओबीसींनी संवैधानिक अधिकारासाठी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:00 PM
पुढील वर्षी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे सांगितले. शासनाने पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची पद्धतनी बंद केली. पीकविमा योजनेत बदल करण्यात येईल हे ही सांगितले. बहुजनांनी पैसे घेवून मते विकण्याची परंपरा निवडणुकीत बंद केली पाहिजे. अन्यथा फक्त पैसेवालेच सत्तेत येतील.
ठळक मुद्देनाना पटोले । कुणबी समाजाचे अधिवेशन उत्साहात