लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राजकारणाचा प्रथम आणि अंतिम उद्देश नेहमीच जनहित व जनसेवा असावा, असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी यांनी येथे केले.गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कामठा, पांजरा, बिरसोला व आसोली जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा कामठा येथील शिवशंकर भात गिरणीच्या प्रांगणात पार पडला. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.याप्रसंगी प्रामुख्याने माजी आ. राजेंद्र जैन, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, अशोक गुप्ता, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, रमेश गौतम, गंगाधर परशुरामकर, केतन तुरकर, सभापती वंदना बोरकर, मनोज दहीकर, खुशबू टेंभरे, रजनी गौतम, प्रकाश देवाधारी, अखिलेश शेठ, विनोद पटले, सौरभ गौतम, सुनिता दोनोडे, सुरेश हर्षे, राजेश भक्तवर्ती, यशवंत गेडाम, किर्ती पटले, जगदीश बहेकार, दिनेश हरिणखेडे, मोहित गौतम, कान्हा बघेले, विनायक खैरे, नूरूदास दिहारी, रामू चुटे, डॉ. शिवणकर, संतोष बिसेन, गंगाराम कापसे, सुरेश कावडे, विकास गेडाम, गंगाराम मानकर, हरिप्रसाद मरठे, महेशप्रसाद मस्करे, हामीदभाई कुरेशी, धनंजय गुप्ता, नाजिम खान, मुकेश तुरकर, रमन उके, सपना अग्रवाल, शोभा गणवीर, योगी येळे, फोगल साठवणे, शामलाल मरस्कोल्हे, भागरता धुर्वे व इतर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.पटेल म्हणाले, विरोधी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेक आरोप लावून स्वत:चा उदोउदो केला. परंतु विकासाच्या केवळ गोष्टी केल्याने विकास होत नाही. त्यासाठी काम करावे लागते. विकासाचा ढिंढोरा पिटणारे गोंदिया-भंडारा जिल्ह्यासाठी साधारण कामही करू शकले नाही. तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्याचा विकास करण्याचा आमचे लक्ष्य आहे. आज प्रश्न विचारण्याची आमची पाळी आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दावे करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारावे की, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून तुम्ही न्याय का करीत नाही. ज्या जीएसटीचा विरोध केला त्याच जीएसटीला वाढवून तुम्ही लागू केले. खोटे आश्वासने देवून भाजप सरकारने मागील तीन वर्षांत काय करून दाखविले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निडरपणे कार्य करावे. पक्षाच्या संघटनेसाठी घरोघरी पोहचावे. जबाबदारीने कार्य करा. गोंदिया -भंडारा जिल्ह्यांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. या वेळी इतर मान्यवरांनीसुद्धा मार्गदर्शन केले.संचालन जितेश टेंभरे व सुनील पटले यांनी केले. आभार बहादूरसिंह यादव यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजकुमार गजभिये, देवलाल लिल्हारे, समरू सेवतकर, युसुफ शेख, इनायत शेख, प्रकाश मेंढे, अरूण दहीकर, सुभाष माहुले, काशिराम भेलावे, बाबा सुलाखे, विरेंद्र सिंहमारे, लोकचंद मुंडेले, बाबुसिंह खोहरे, देवेंद्र पागोटे, मोतीराम शिवणकर, उदयसिंह खोहरे यांनी सहकार्य केले.इतर पक्षांतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेशयाप्रसंगी परिसरातील भाजप, काँग्रेस, शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा स्वागत खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यात दुर्गासिंग नागपुरे, मनोज लिल्हारे, अफसर खान, रतन दमाहे, गजनलाल नागपुरे, निलंक तेलासे, परमानंद मेश्राम, अंकुश वासनिक, अनिपल उके, अमित वासनिक, मुलचंद खोहरे, दुर्योधन वासनिक, राजेंद्र गजभिये, योगेंद्र कटरे, कासमभाई शेख, जबराम रणगिरे, मनिष लिल्हारे, राजेंद्र सोनवाने, ज्ञानिराम चौधरी, संतोष चौधरी, कैलाश वाघाडे, मिथून मोहारे, राजू पाटील, संतोष ताटीकर, दिलीप टेकाम, मनोज वाघाडे, बिसन नेवारे, दिनेश नेवारे, गौतम बहेकार, रोहित देवगडे, राधेश्याम मेंढे, इंद्रराज लिल्हारे, उद्रेश बुरडे, दिलीप लिल्हारे, प्रकाश मेंढे यांचा समावेश आहे
राजकारणाचा उद्देश केवळ जनहित व जनसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 9:56 PM
राजकारणाचा प्रथम आणि अंतिम उद्देश नेहमीच जनहित व जनसेवा असावा, असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी यांनी येथे केले. गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कामठा, पांजरा, बिरसोला व आसोली जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा कामठा......
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : कामठा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे संमेलन