गोंदिया : जिल्हा पोलिसांनी रविवारी केलेल्या कारवाईत २७ अवैध दारु विक्रेत्यांकडून माल जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तिरोडा पोलिसांनी केसलवाडा येथील विनोद बालचंद कनोजे (३२) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, भुराटोला येथील मधुमालती निरंजन भालाधरे (३२) हिच्याकडून ३० लिटर हातभट्टीची दारु, अवंती चौक भूतनाथ वार्ड येथील मनोहर आडकू राऊत (४५) याच्याकडून ८ लिटर हातभट्टीची दारु, गोंदिया ग्रामीण पोलिसांनी फुलचूर येथील जसवंत दसाराम कटरे (३९) याच्याकडून १२ लिटर हातभट्टीची दारु, दवनीवाडा पोलिसांनी गोंडमोहाडी येथील पुष्पा लालचंद नेवारे (३२) या महिलेकडून १० लिटर हातभट्टीची दारु, चिचगड पोलिसांनी कुणबीटोला येथील दिनेश माधोराव मेश्राम (३६) याच्याकडून १५ लिटर हातभट्टीची दारु, गोरेगाव पोलिसांनी तिमेझरी येथील बालकचंद मुका डोंगरे (६०) याच्याकडून ४ देशी दारुचे पव्वे, सालेकसा पोलिसांनी सोनपुरी येथील सयाराम बळीराम नागपुरे (३६) याच्याकडून १९२ देशी दारुचे पव्वे, लक्ष्मण सोहन बनोठे (३२) याच्याकडून १२ देशी दारुचे पव्वे, बालटोला येथील शंकर रामू पुराम (४०) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, विष्णु असमन टेकाम (४०) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या डव्वा येथील मालन किसन सोनवाने (४५) हिच्याकडून ४ देशी दारुचे पव्वे, सौंदड येथील शुध्दमता भिवराम भैसारे (४८) या महिलेकडून ६ लिटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. बाम्हणी खडकी येथील जितेंद्र सखाराम ठवरे (४०) याच्याकडून ४ नग देशी दारुचे पव्वे, देवरी येथील सुमित्रा परसराम दिघोरे (६५) हिच्याकडून ३० देशी दारुचे पव्वे, अर्जुनी-मोरगाव ठाण्यांतर्गत रमेश गोविंदा फुलबांधे (५३) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. इटखेडा येथील निलकंठ अंताराम खरकाटे (७०) याच्याकडून ५ देशी दारुचे पव्वे, शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिचबन मोहल्यातील अरुण मयाराम घरडे (४२) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, गोवर्धन चौक छोटा गोंदिया येथील कमलेश केशोराव पडोळे (४८) याच्याकडून ७ लिटर दारु, लेंडेझरी येथील मुकेश मारगाये (२६) व रविंद्र लाभकासे (२२) याच्याकडून दारू पकडण्यात आली.विशेष पथकाने पकडले ९६ पव्वे फुलचूर नाक्यावर नाकाबंदी दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तांडा (अदासी) येथील संतोष देवीसींह बैस (३८) याच्याकडून १८० मिलीचे ९६ देशी दारुचे पव्वे जप्त करण्यात आले. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, चंद्रकांत करपे, हरिश्चंद्र शेंडे, श्यामकुमार डोंगरे, दुर्योधन हनवते व राकेश डोंगरवार यांनी केली आहे.
अवैध दारु विक्रेत्यांवर गुन्हा
By admin | Published: April 04, 2017 1:03 AM