शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे गुन्हाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 5:00 AM

अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे म्हणजे सर्रास त्यांना रस्त्यावर दुसऱ्याला मारून टाकण्याची परवानगी देण्यासारखे आहे. वाहन जलद गतीने चालवितांना अल्पवयीन मुले-मुले स्वत:चा जीव धोक्यात टाकतात सोबतच रस्त्यावरून चालणाºया निरअपराध लोकांचाही बळी घेतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुलाने चुकी केल्यास बापाला शिक्षा करण्याचा वाहतूक नियम लागू करावा असे मत शहरातील नागरिकांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण विभाग सुरू करणार मोहीम : शिक्षा देण्याचा कायदा लागू करा

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे म्हणजे सर्रास त्यांना रस्त्यावर दुसऱ्याला मारून टाकण्याची परवानगी देण्यासारखे आहे. वाहन जलद गतीने चालवितांना अल्पवयीन मुले-मुले स्वत:चा जीव धोक्यात टाकतात सोबतच रस्त्यावरून चालणाºया निरअपराध लोकांचाही बळी घेतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुलाने चुकी केल्यास बापाला शिक्षा करण्याचा वाहतूक नियम लागू करावा असे मत शहरातील नागरिकांनी व्यक्त केले.३ मार्च रोजी गोंदियाच्या गौशाला वार्डात झालेल्या अपघातात एका ६ वर्षाच्या निरागस मुलीचा अपघातात मृत्यू झाला. ट्रकची स्कुटीला धडक झाली. अल्पवयीन मुलगा स्कुटी चालवित असताना हा अपघात घडला. त्याला कायद्याचे ज्ञान नाही, वाहनाचा परवाना नाही तरीही रस्त्यावर बेधडक भरधाव वेगात वाहन चालवून मुलीचा बळी घेतला. या पार्श्वभूमीवर लोकमतने विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.जिल्ह्यातील हजारो पालक आपल्या पाल्यांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हातात वाहन देतात. १८ वर्षापेक्षा कमी वयाची मुले वाहन चालवित असताना रस्त्यावरील पादचाऱ्यांचा बळी घेतात. हजारो मुले विना परवाना वाहन चालवित असतात. ज्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त असते त्या चौकात हे अल्पवयीन मुले जात नाही. त्यांची नजर चोरून इतर गल्लीतून वाहन सुसाट वेगात चालवितात.गोंदिया शहराची परिसथिती पाहता व्यापारी वर्गाने आर्डर केलेला माल हा केव्हाही खाली केला जातो. त्यांच्यासाठी ठरावीक वेळ असावा, माल खाली करताना वाहन व्यवस्थित पार्र्कींग करावे, गोंदिया शहरातील रस्त अरूंद असल्याने व्यापाऱ्यांची माल खाली करण्याची वेळ ठरावीक असावी, माल खाली करण्यासाठी वेळ द्यावा त्या वेळात माल खाली करणे अपेक्षीत आहे.वाहन चालविण्यात स्वत:ला कुशल समजणारे हे अल्पवयीन बालके ओव्हरटेकच्या नादात अपघात करतात.वाहतूक पोलिसांच्या समोरून एखादा अल्पवयीन मुलगा किंवा नियमाचा भंग करणारा वाहन चालक पोलिसांच्या समोरून जोरात वाहन चालवत नेत असले तर त्याचा पाठलागही करणे पोलिसांना बंधनकारक आहे. अपघात होऊ शकतो म्हणून नियम तोडणाºयाचा पाठलाग करू नका असे आदेश आहेत.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.१९८ अल्पवयीन वाहन चालकांना दंडअल्पवयीन मुले विना परवाना वाहन चालवितांना वाहतूक पोलिसांनी १९८ जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख ९८ हजार रूपये दंडही वसूल करण्यात आला. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्याला कडक करताना अल्पवयीन मुलगा वाहन चालवितांना आढळल्यास त्यांच्या वडीलांना ३ वर्षाचा कारावास व १० हजार रूपये दंड ठोठावण्याचा तो कायदा आणला तो महाराष्ट्रत लागू झाला नाही. तो आता लागू करण्याची गरज आहे.पालकांनी आपल्या अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात वाहन देऊ नये,कुणीही भरधाव वाहने चालवू नका, ओव्हरटॅक करू नका, जड वाहन चालविणाऱ्यांनी वाहन अत्यंत कमी स्पीडने चालवावे, वळणावर वाहन पार्र्कींग करू नये.- दिनेश तायडे,पोलीस निरीक्षकवाहतूक नियंत्रण शाखा

 

टॅग्स :Socialसामाजिक