लोकमत न्यूज नेटवर्कहुपराज जमईवारगोंदिया: शिक्षणासाठी कंबर कसलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या आजच्या लेकी सुना मैदानात उतरून कबड्डी खेळताना दिसणे हा गोंदिया जिल्ह्यातल्या परसवाडा येथील समस्त गावकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय होता. निमित्त होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे. दरवर्षी येथे ही जयंती क्रीडा स्पर्धा घेऊन साजरी केली जाते. यात प्रौढ वयोगटातील स्त्रिया कबड्डीच्या सामन्यात सहभागी होतात. यंदाची जवळपासच्या ११ गावांमधील स्त्रियांनी आपले क्रीडाकौशल्य यात आजमावले.
सावित्रीच्या लेकी खेळल्या हिरीरीने कबड्डी; गोंदिया जिल्ह्यात आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 4:08 PM
शिक्षणासाठी कंबर कसलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या आजच्या लेकी सुना मैदानात उतरून कबड्डी खेळताना दिसणे हा गोंदिया जिल्ह्यातल्या परसवाडा येथील समस्त गावकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय होता. निमित्त होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे.
ठळक मुद्देप्रौढ स्त्रियांचे कबड्डीचे सामने