शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
2
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
3
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
4
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
5
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाले?
6
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
7
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
8
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
9
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
10
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
11
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
12
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
13
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
14
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
15
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
16
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
17
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
18
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
19
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
20
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 9:29 PM

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र यामुळे शहरवासीयांची आणि वाहन चालकांची कोंडी होणार होती.

ठळक मुद्देबैठकीत निर्णय : पुलाचे करणार स्ट्रक्चर आॅडिट,अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र यामुळे शहरवासीयांची आणि वाहन चालकांची कोंडी होणार होती. ही समस्या ओळखत आ. गोपालदास अग्रवाल यांनी गुरूवारी (दि.२६) नागपूर येथे रेल्वे आणि संबंधित विभागाची बैठक घेतली. सध्या जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करु नये अशी मागणी केली. ती रेल्वे विभागाने सध्या मान्य केली आहे. त्यामुळे जुन्या उड्डाणपुलावरुन हलक्या वाहनाची वाहतूक सुरू राहणार आहे.गोंदिया येथील जुन्या उड्डाणपुलाच्या विषयावर गुरूवारी नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बांधकाम विभागाचे राज्य सचिव अजित सगणे, मुख्य अभियंता देबडवार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे उपकार्यकारी अभियंता सौरभ गुप्ता, मंडळ अभियंता नारायणलाल, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण उपस्थित होते. आ.अग्रवाल यांनी जुना उड्डाणपुल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यास शहरातील नागरिकांची अडचण होईल. शिवाय वाहतुकीची कोंडी होईल. तसेच नवीन उड्डाणपुलावर पादचारी पुलाची व्यवस्था नसल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचण निर्माण होईल. शिवाय अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जुना उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद न करता नागरिकांना ये-जा करण्यासाठी व हलक्या वाहनाना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी लावून धरली. जुना उड्डाण पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट त्वरीत करुन आवश्यक दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या पुलाचा स्ट्रक्चरल आॅडिट रिर्पोट येईपर्यंत या पुलावरुन हलक्या वाहनाची वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, डीआरएम शोभना बंडोपाध्याय यांना देण्यात आली.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालpwdसार्वजनिक बांधकाम विभाग