लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गंज वॉर्ड स्थित जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील बारदान भरून असलेल्या दोन खोल्यांना आग लागल्याने बारदाना जळून खाक झाला. रविवारी (दि.२३) रात्री ९.३० वाजतादरम्यान ही घटना घडली असून या आगीमुळे बाजार समितीचे सुमारे ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.येथील गंज वॉर्डातील कृषी उत्पन्न बाजार समिती आता मोक्षधाम मार्गावरील नवीन मार्केट यार्डात स्थानांतरीत करण्यात आली आहे. तरिही जुन्या बाजार समितीमधील दोन खोल्यांत बारदाना भरले होता. एका खोलीत जूटचा बारदाना तर दुसऱ्या खोलीत प्लास्टीक बारदाना भरून होता. रविवारी (दि.२३) रात्री ९.३० वाजतादरम्यान अचानकच या खोल्यांना आग लागली. याबाबत बाजार समिती सचिव सुरेश जोशी यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. यावर लगेच अग्निशमन विभागाने वाहन घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरूवात केली.तीन अग्निशमन वाहनांच्या मदतीने अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र या दोन खोल्यांत ठेवलेला बारदाना जळून खाक झाला. यात बाजार समितीने सुमारे ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तर ही आग कशी लागली याबाबत मात्र कळू शकले नाही. या घटनेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभारी अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, वाहनचालक लोकचंद कावडे, वाहनचालक रंजीत रहांगडाले, फायरमेन मुकेश ठाकरे, सचिन बहेकार, मोहनिश नागदवने, जितेंद्र गौर, राजेश यादव, अमोल भांडारकर, ओमप्रकाश यादव आदिंनी सहकार्य केले.
जुन्या बाजार समितीत लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 9:21 PM
शहरातील गंज वॉर्ड स्थित जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील बारदान भरून असलेल्या दोन खोल्यांना आग लागल्याने बारदाना जळून खाक झाला. रविवारी (दि.२३) रात्री ९.३० वाजतादरम्यान ही घटना घडली असून या आगीमुळे बाजार समितीचे सुमारे ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देरविवारी रात्रीची घटना : दोन खोल्यांतील बारदाना जळून खाक