शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

सर्वात जुन्या शाळेला केरकचऱ्याचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 9:37 PM

तालुक्यातील सर्वात जुनी शाळा म्हणून ओळखली जाणारी बाजार चौकातील प्राथमिक शाळा आजघडीला चारही बाजुंनी घाण व कचºयाच्या ढिगाºयांनी वेढलेली आहे. सांडपाण्याने भरलेली गटारे सुद्धा शाळेच्या परिसरात असून सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शाळेत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष, पालकांमध्ये रोष

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील सर्वात जुनी शाळा म्हणून ओळखली जाणारी बाजार चौकातील प्राथमिक शाळा आजघडीला चारही बाजुंनी घाण व कचºयाच्या ढिगाºयांनी वेढलेली आहे. सांडपाण्याने भरलेली गटारे सुद्धा शाळेच्या परिसरात असून सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शाळेत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो. या बाबीकडे शालेय प्रशासनासह स्थानिक प्रशासन सुद्धा सपेशल दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.१९६० मध्ये सुरु झालेली आमगाव खुर्द (सालेकसा) येथील ही शाळा आज ५८ वर्षांची झाली असून या शाळेतून शिक्षण प्राप्त करुन मोठमोठ्या पदावर विद्यार्थी पोहोचले आहेत. परंतु या शाळेची परिस्थिती आज सर्वात दयनीय झाली आहे. शाळेत एकूण सात शिक्षक व १४० विद्यार्थी पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेत आहेत. मोठे दिग्गज राजकारणी या गावात राहत असून त्यांच्या डोळ्यादेखत चालणारी शाळा घाण व कचºयाच्या ढिगाºयात भरत असेल तर याला काय म्हणायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य घडविणारे असून त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचे काम शिक्षण विभागासह स्थानिक प्रशासन करीत असल्याचे चित्र आहे. दुदैवाची बाब म्हणजे, या शाळेच्या एका बाजूला स्वच्छतेचा संदेश देणाºया महात्मा गांधी यांचा पुतळा आहे.शाळेच्या प्रवेशद्वारा जवळच सिमेंटची कचराकुंडी ठेवण्यात आली असून ती पूर्णपणे भरली आहे. त्यातून दुर्गंधी पसरत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. या परिसरात राहणाºया लोक आणि दुकानदारांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. येथून गावातील सांडपाणी वाहून नेणाºया नाल्या गेल्या असून या नाल्यातून पाणी पुढे वाहत नसल्याने घाण व दूषित पाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे.शाळेच्या बाजूलाच आठवडी बाजार भरत असून तेथील कचरासुद्धा शाळेच्या भिंतीजवळ पडून असतो. आश्चर्याची बाब म्हणजे शाळेच्या प्रवेश द्वारा लगत उंच गावत वाढलेले आहे. अशात विषारी जीवजंतूचा वावर असण्याची शक्यता असते.याकडे सुद्धा शाळेच्या मुख्याध्यापकांसह शाळा समितीच्या लोकांचे दुर्लक्ष झाले आहे. समितीच्या एका सदस्याला विचारले असता, येथील समस्यांबद्दल आपण मुख्याध्यापकांशी चर्चा केली, परंतु त्यांनी योग्य पाऊल उचलून समस्या दूर करण्यासाठी हवे तसे प्रयत्न केला नसल्याचे सांगीतले.या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी मुले गरीब मजुरांची असून त्यांना आपला दिवसभराचा वेळ आपल्या कामासाठी घालवावा लागतो. त्यामुळे ते एकदा आपल्या पाल्याला शाळेत पाठवून त्याकडे निश्चित होतात. परंतु त्यांच्या पाल्यांच्या भविष्याशी खेळ खेळण्याचे काम होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परंतु गरीबांच्या मुलांना सुद्धा चांगले शिक्षण मिळावे, त्यांना सुद्धा आधुनिक सोयी, सुविधा व स्वच्छ, सुंदर शाळा उपलब्ध व्हावी, या दिशेने कोणीच पाऊल उचलताना दिसत नाही.शाळा समितीचे अध्यक्ष मालकन भोयर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.आपली एक महिन्यापूर्वीच या शाळेत बदली झाली आहे. त्यामुळे येथील प्रशासनाबद्दल विस्तृत माहिती नसून स्वच्छतेच्या समस्येबद्दल यापुढे पाऊल उचलण्यात येईल.-के.एन. शेंडे, मुख्याध्यापिकासदर शाळा आमगाव खुर्दमध्ये असून नुकताच आमगाव खुर्दचा समावेश सालेकसा नगर पंचायतमध्ये झाला आहे. विद्यमान परिस्थितीत या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी निधी उपलब्ध नाही. यापुढे निधी आल्यावर संपूर्ण क्षेत्रात स्वच्छतेची कामे केली जातील.आर.पी. चिखलखुंदे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, सालेकसाशाळा परिसरात पसरलेल्या घाणीबद्दल स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी कळविण्यात आले. परंतु तरी सुद्धा लक्ष देण्यात आले नाही. काही दिवसातच गावातील काही युवकांच्या सहकार्याने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.- सुनील असाटी, स्वच्छतादूत, सालेकसा