लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्त कार्यालयातर्फे दोन एजन्सींना काम देऊन कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्याचे काम देण्यात आले. परंतु नियोजनशून्य कारभारामुळे गोंदियात सहाव्या दिवशीही गोंधळ उडाला. दुपारपासून सुरक्षासंच वाटप करणे बंद झाल्यामुळे दीड हजार मजूर रात्रीपर्यंत सुरक्षा संचासाठी रांगेत भूक व तहानेने व्याकूळ झाले होते. आज (दि.५) रोजी काही महिला बेशुध्द पडल्या होत्या. दरम्यान बुधवारी कामगारांची गैरसोय लक्षात घेत आ.विनोद अग्रवाल यांनी प्रीतम लॉन येथे भेट दिली. तसेच संचाचे वाटप होईपर्यंत तिथेच ठाण मांडून बसले होते.गोंदियातील सहायक आयुक्त कामगार कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यात नोंदणी असलेल्या ७६ हजार ४७८ कामगारांपैकी ज्यांनी सतत ९० दिवस काम केले अशा ३१ हजार ६१४ कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संच द्यायचे होते. निवडणुकीपूर्वी अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, तिरोडा व गोंदिया या तालुक्यातील काही कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले होते. परंतु हे संच वाटप करतांना सहाय्यक आयुक्त उज्वल लोया यांनी खबरदारी न घेतल्यामुळे महिला कामगारांची बुधवारी (दि.५) खूप गैरसोय झाली. मागील सहादिवसांपासून गोंदियात हे सुरक्षा संच वाटप करण्याचे काम सुरू आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत एकूण १४ हजार ७५ कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले. १७ हजार ५३९ कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले नाही.आज (दि.५) रोजी कालचे दोन ट्रक आलेले साहित्य वाटप करायला सुरूवात करण्यात आली.दुपारी १.३० वाजता पर्यंत साहित्य वाटप केल्यानंतर ऑनलाईन करणाऱ्या त्या दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी आपले ऑनलाईनचे सर्व साहित्य गुंडाळून पसार झाले.अर्धा ट्रक सुरक्षा संच शिल्लक असतांना ते वाटप न करता घेऊन गेले. दुपारपासून कामगार संचाची वाट पाहात होते. त्याचे हाल होत असूनही त्यांच्या मदतीसाठी कुणी धाऊन न आल्यामुळे गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रितम लॉन गाठून ऑनलाईन करणाºया व संच वाटप करणाºया कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कामगारांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. कामगार आयुक्त कार्यालयाकडून कुणीही अधिकारी नाही, ज्या कंपनीला काम देण्यात आले त्या कंपन्यांचे कर्मचारी नाहीत आणि सुरक्षा संचाच्या प्रतिक्षेत असलेल्या उपाशी व तहानेने व्याकूळ असलेल्या कामगारांच्या मदतीसाठी आ.अग्रवाल धाऊन गेले. कामगारांसाठी चहा व नास्ताची सोय त्वरीत करण्याची तत्परता त्यांनी दाखविली. सायंकाळी ७ वाजता दीड हजार कामगारांच्या सोबत अंधाºया ठिकाणी आ.अग्रवाल थांबून संच वाटप करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी व सहाय्यक कामगार आयुक्त उज्वल लोया यांच्याशी ते फोनवर सतत चर्चा करीत होते.चार महिन्यापूर्वीचे अर्ज शोधताहेत कामगारगोंदिया पंचायत समितीच्या जुन्या सभागृहात मागील तीन दिवसांपासून शेकडो कामगार चार महिन्यापूर्वीचे स्वत:चे अर्ज शोधत बसले होते. यावर आवाज उठविताच पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांनी त्या अर्जांना एका खोलीत टाकून दिले होते. विधानसभा निवडणुक पाहून कामगारांचे अर्ज कचºयासारखे फेकण्यात आले होते. त्यानंतर ते अर्ज ऑनलाईन न झाल्याने आता ते अर्ज शोधण्यासाठी कामगारांची स्पर्धा लागली आहे. होती परंतु त्या अर्जांना आता कुलूप बंद करण्यात आले आहे. प्रितम लॉन येथे कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच देण्याचे काम ४ फेब्रुवारीपासून करण्यात येत आहे. ह्या सुरक्षा संचाला देण्यासाठी फुलचूर येथे फोटो काढून ऑनलाईन करण्यात आले होते.आम्ही चार दिवसापासून कामगारांची कामे व्हावीत यासाठी त्यांना मदत व्हावी म्हणून आमचे कार्यकर्ते कामगारांच्या मदतीला दिले. मात्र त्या मदतीला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्यामुळे कामगारांचे हाल झाले. सरकार आमचे आहे असे सांगून आमच्यावर ताशेरे ओढणाºयांनी कामगारांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यायला पाहिजे होता.- विनोद अग्रवाल, आमदार, गोंदिया विधानसभा.
संचाच्या प्रतीक्षेत दीड हजार कामगारांनी दिवस घालविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 6:00 AM
मागील सहादिवसांपासून गोंदियात हे सुरक्षा संच वाटप करण्याचे काम सुरू आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत एकूण १४ हजार ७५ कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले. १७ हजार ५३९ कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले नाही.आज (दि.५) रोजी कालचे दोन ट्रक आलेले साहित्य वाटप करायला सुरूवात करण्यात आली.
ठळक मुद्देदुपारपासून संच वाटप बंद : कामगार आयुक्त कार्यालयाचे कुणीच हजर नाहीत