लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे प्रसिद्ध नागरा शिव मंदिरापर्यंत बायपास मार्गाच्या बांधकामासाठी भूमी अधिग्रहणाकरिता एक कोटींचा निधी सा.बां. विभागाला (रोहयो) मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून गोंदिया-बालाघाट राज्यमार्ग ते सरळ शिव मंदिर नागरापर्यंत रूंद बायपास मार्गासाठी जमीन मिळवून घेण्यात येईल. या रस्त्याचे बांधकाम झाल्यावर भाविकांना नागरा शिवमंदिरात ये-जा करणे सोयीचे होईल.सध्या मुख्य मार्गाने नागरा शिव मंदिरात पोहोचण्यासाठी गावाच्या मधातून जावे लागते. या रस्त्याची रूंदी कमी आहे. तसेच अनेकांनी घरांच्या ओट्यांचे बांधकाम केल्याने रस्ता आणखी अरूंद झाला आहे. त्यामुळे इतर दिवशी अडचण होत नसली तरी शिवरात्री व इतर सणांप्रसंगी होणाऱ्या गर्दीमुळे भाविकांना शिव मंदिर-भैरव मंदिरात पोहोचण्यासाठी मोठाच त्रास होतो. ही समस्या बायपास रस्त्यामुळे सुटणार आहे.काही दिवसांपूर्वी आ. अग्रवाल यांच्या पुढाकाराने नागरा शिव मंदिर परिसराच्या विकासासाठी महाराष्टÑ राज्य तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत दोन कोटींचा निधी शासनाने मंजूर केला होता. त्यातून भक्त निवास, संरक्षण भिंत, शौचालय, सिमेंट रस्ते, पथदिवे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळवून घेण्याकरिता तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळणे आवश्यक होते. त्यासाठी आ. अग्रवाल यांनी पाठपुरावा करून ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून दिला व परिसर विकासासाठी दोन कोटींच्या निधीलाही मंजुरी मिळवून दिली.नागरा येथील शिवमंदिर प्राचीन असून गोंदिया, भंडारा व बालाघाटसह मध्य भारतातील हजारो भाविकांसाठी आस्था व श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे येथे येणाºया भाविकांना सुविधा देणे, नागरा ग्राम व मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आ. अग्रवाल यांनी प्रयत्न केले आहे. त्यामुळे येथे तलावाचे सौंदर्यीकरण, विद्युतीकरण व तलावाच्या पाळीवर पेविंग ब्लॉक पथचे बांधकाम महाराष्टÑ राज्य पर्यटन विकास महामंडळाद्वारे करण्यात आले. नागराच्या शिवमंदिरात पोहोचण्यासाठी सध्याच्या मार्गाचे डांबरीकरण केले जात आहे. तर गोंदिया-बालाघाट मार्ग ते सरळ बायपास मार्गाच्या बांधकामासाठी मार्ग प्रशस्त झाला आहे. त्यामुळे दरवर्षी शिवरात्री पर्वावर प्रवाशांना होणारी ट्रॉफीक जामची समस्या आता होणार नाही.विशेष म्हणजे नागरा शिव मंदिराचा इतिहास ८०० वर्षांपेक्षाही प्राचीन आहे. तसेच परिसरात भारतीय पुरातत्व विभागाद्वारे केलेल्या खोदकामात प्राचीन अनेक मानवनिर्मित अवशेषसुद्धा प्राप्त झाले आहेत. त्यामुळे नागराधामचा विकास व्हावा अशी मागणी आहे.
बायपास मार्गासाठी एक कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 10:12 PM
आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे प्रसिद्ध नागरा शिव मंदिरापर्यंत बायपास मार्गाच्या बांधकामासाठी भूमी अधिग्रहणाकरिता एक कोटींचा निधी सा.बां. विभागाला (रोहयो) मंजूर करण्यात आला आहे.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तीर्थक्षेत्र नागरा मंदिरापर्यंत होणार रस्ता